मुंबई : जिओने टेलिकॉम क्षेत्रात आल्यापासून ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर आणल्या आहेत. जिओच्या या ऑफर्समुळे इतर स्पर्धक कंपन्यांना कमी दरात सेवा देणे गरजेचे झाले आहे. प्रत्येक ग्राहकाला आपल्याकडे ओढण्यासाठी अनेक ऑफर्स देऊ केल्या जातात. यात कॅशबॅक ऑफर्सचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. उद्यापासून नववर्षाची सुरुवात होत आहे. यानिमित्ताने जिओने आपल्या ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे. या कॅशबॅक ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला ३९९ रुपयांचे रिचार्ज करावे लागणार आहे. तरच तुम्हाला १०० टक्के रक्कम परत मिळेल. ही कॅशबॅक ऑफर 'AJIO' या जिओच्या फॅशन वेबसाईटवर मिळेल, म्हणजेच तुम्हाला कॅशबॅकमध्ये मिळालेली रक्कम ही या वेबसाईटवरुन वस्तू खरेदी करुन संपवावी लागणार आहे. ही ऑफर  ३१ जानेवारी २०१९ पर्यंत सुरु असणार आहे.


असा फायदा घ्या कॅशबॅकचा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही कॅशबॅक मिळवण्यासाठी देखील काही अटी आहेत. जवळपास ४०० रुपयापर्यंतची कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्हाला एका महिन्याच्या आत ३९९ रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. ही कॅशबॅक ऑफर फक्त ३९९ च्या रिचार्जवरच मिळणार आहे. जिओच्या ग्राहकांना या ऑफरचा लाभ २८ डिसेंबर ते ३१ जानेवारी २०१९ पर्यंत घेता येणार आहे. AJIO या फॅशन वेबसाईटवर खरेदी करताना, सवलत मिळवण्यासाठी, ग्राहकांना किमान १००० रुपयांची खरेदी करावी लागेल.


ऑफरचा लाभ घ्या


तुम्ही जर जिओचे ग्राहक असाल, सर्वात आधी MY JIO अॅपच्या माध्यमातून ३९९ रुपयाचे रिचार्ज करावे लागेल. यानंतर तुम्हाला ३९९ रुपयाचे डिस्काउंट कूपन मिळेल. तुम्ही हे कूपन MY JIO अॅपच्या MY Coupon या सेक्शन मध्ये पाहू शकता. जेव्हा तुम्ही AJIO या वेबसाईटवरुन खरेदी कराल, यानंतर डिस्काउंट कूपनचा वापर करता येणार आहे.