मुंबई: तंत्रज्ञान प्रगतीशीबरोबरच अनेक आर्थिक घोटाळे (Financial Fraud) झाल्याच्या घटना सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. फसवणूक करणारे दिवसेंदिवस नवीन नवीन शक्कल लढवून लोकांना फसविण्याचा प्रयत्न करतायत. आपल्यापैकी अनेकांना बँक खात्यातील केवायसी (kyc) साठी एखादी लिंक वर क्लीक करणारा एखादा मेसेज येतो आणि याच मॅसेजच्या माध्यमातून अनेकांना फसवले जाते. पैसे मिळविण्यासाठी या लिंक वर क्लिक करा, असा मेसेज मोबाईलवर येतो. अनेकजणांना तर त्यांच्या बँकेच्या खात्यातून काही पैसे कमी झालेले आहे याची त्यांना माहिती सुद्धा नसते, जेव्हा हे लोक आपल्या बँकेमध्ये पासबुक एन्ट्री करण्यासाठी जातात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की आपल्या खात्यातून काही पैसे कमी झाले आहेत. अशीच एक घटना एका महिलेबरोबर घडली असून महिलेचे एक लाखांहून अधिक पैसे बॅक खात्यातून कट झाले आहेत. मोबाईलवर मेसेज आला आणि त्या मेसेजवरील लिंकवर क्लिक केले असता त्या महिलेला OTP चा मेसेज आला आणि बॅक खात्यातून 1 लाखांहून अधिक पैसे कट झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंधेरीमधील Urvashi Phetiya असं या महिलेचे नाव असून या महिलेल्या 3 वेळा मोबाईलवर OTP चा मेसेज आला. या मेसेजमध्ये त्यांना पॅनकार्ड अपडेट करायला सांगितले. या OTP मेसेजमध्ये त्यांच्या बॅक खात्याची लिंकही होती. त्यानंतर महिलेने लिंक ओपन करताच त्यांचा मोबाईल पासवर्ड विचारण्यात आला. त्यांनी पहिला OTP  टाकताच. त्यांच्या मोबाईलवर आणखी तीन OTP मेसेज आले. त्यांनी तीनही OTP टाकले अन् त्यांच्या बँक खात्यातून 1.24 लाख रुपये कापण्यात आले. हे पैसे 5 मिनिटांतील 3 transaction नंतर बॅक खात्यातून पैसे कट झाले. यानंतर, महिलेला बँकेकडून कन्फर्मेशन कॉल आला. ज्यामध्ये तिला विचारण्यात आले की तिने हे व्यवहार पूर्ण केले आहेत का? यानंतर त्या महिलेल्या आपल्यासोबत सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यासर्व प्रकरणानंतर महिलेने पोलिसांत तक्रार नोंद केली. 


पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या नंबरवरून महिलेला SMS आला होता तो नंबर ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेव्हा त्यांनी या लिंकवर क्लिक केले तेव्हा फोन मिररिंग अॅपद्वारे स्कॅमर्सनी त्यांचा फोन ऍक्सेस केला. याच मदतीने फोनमध्ये घडणाऱ्या सर्व हालचाली पाहणे शक्य झाले होते.  


असे सुरक्षित रहा - 
KYC अपडेट किंवा लॉटरी मेसेज लिंकवर कधीही क्लिक करू नका. थर्ड पार्टी साइटवरून फोनवर कोणतेही अॅप किंवा सॉफ्टवेअर डाउनलोड करणे टाळा. तसेच जर तुमच्या सोबत एखादा आर्थिक घोटाळा झाला असेल तर अशावेळी  सर्वात आधी आपल्या बँकेला याबद्दल कळवायला हवे. अशा प्रकारची कुठलीही घडलेली घटनाबद्दलची माहिती बँकेला 24 तासाच्या आत देणे अनिवार्य आहे. तुम्ही बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर कॉल करून बँकेच्या प्रतिनिधींना याबद्दलची सविस्तर माहिती देऊ शकता आणि तुमची तक्रार रजिस्टर करू शकता. किंवा थेट तुम्ही बँकेमध्ये जाऊन बँकेच्या प्रतिनिधींना घडलेली घटना सविस्तर पणे सांगून योग्य ती तक्रार सुद्धा करू शकतात. जर तुमच्या बँकेच्या खात्यातून फसवणुकी द्वारे काही रक्कम काढली गेली असेल तर याबाबत तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा करू शकतात अशा प्रकारच्या सगळ्या घटना सायबर सेल अंतर्गत यांचा समावेश केला जातो.