Dadasaheb Phalke Is Today`s Google Doodle : अभिनेत्रीच्या रोलसाठी दादासाहेबांची सेक्स वर्कर्सनाही विचारणा
देशातला पहिला सिनेमा बनवणारे दादासाहेब फाळके यांचा चित्रपटनिर्मिर्तीचा संघर्ष रोमहर्षक आहे.
मुंबई : भारतीय सिनेमाचे पितामह म्हटले जाणारे दादासाहेब फाळके यांचा आज १४८ वां जन्म दिवस आहे. गुगलने डुडल बनवून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. दादासाहेब फाळके यांचा जन्म ३० एप्रिल १८७० रोजी नाशिक शहरात झाला. फाळके यांचं नाव धुंडीराज गोविंद फाळके असं होतं. फाळके यांचे वडील शास्त्री फाळके हे संस्कृत विषयात पंडीत होते. फाळके परिवार पुढे मुंबईत आलं. दादासाहेब फाळके यांचं मन नेहमीच सर्जनशीलतेकडे होतं.१८५५ मध्ये दादासाहेब फाळके यांनी मुंबईत जे जे कॉलेज ऑफ आर्टसमध्ये प्रवेश घेतला.
दादासाहेब फाळके यांनी नाटक कंपनीत चित्रकार आणि पुरातत्व विभागात फोटोग्राफर म्हणून काम पाहिले, जेव्हा त्यांचं मन याच्यातही लागलं नाही, तेव्हा त्यांनी चित्रपट निर्मिती करण्याचा ध्यास घेतला. मित्राकडून पैसे घेऊन ते लंडनला निघून गेले.
लंडनमध्ये दादासाहेब फाळके यांनी २ आठवडे काढले, यात त्यांनी चित्रपट निर्मितीचं तंत्र आत्मसाथ केलं आणि मुंबईला परतले. भारतात त्यांनी फाळके चित्रपट कंपनीची स्थापना केली आणि, राजा हरिश्चंद्र नावाच्या सिनेमाची निर्मिती केली.
तसं पाहिला तर मार्ग तसा सोपा नव्हता, सुरूवातीला तर चित्रपटासाठी फायनान्सर नाही मिळाला, आणि त्यांना वाटत होतं की, अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी महिला हवी होती. पण कुणीही त्यांना हो म्हटलं नाही, कारण तेव्हा महिलांनी चित्रपटात काम करणे योग्य मानलं जात नव्हतं.
महिला अभिनेत्री शोधण्यासाठी त्यांनी सेक्स वर्करच्या कोठ्यातही विचारपूस केली. अखेर त्यांना यश आलं नाही, म्हणून त्यांनी एका भोजनालयात स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या अण्णा साळुंखेंना अभिनेत्री म्हणून निवडलं.
चित्रपट निर्मितीसाठी लागणारा लहान मोठा खर्च दादासाहेब फाळके यांनी उचलला आणि १५ हजार रूपये खर्च करून, मराठी सिनेमाची निर्मिती केली, ३ वर्ष मेहनत घेतल्यानंतर ३ मे १९१३ साली मुंबईच्या कोरेनेशन सिनेमात, पहिल्यांदा भारतीय निर्मात्यांनी तयार केलेला पहिला सिनेमा रिलीज झाला, राजा हरिश्चंद्र. ४० मिनिटाचा हा सिनेमा तिकीट खिडकीवर सुपर हिट ठरला.