मुंबई : आपण बऱ्याच गोष्टी माहित करुन घेण्यासाठी गुगलचा वापर करतो. येथे आपल्याला जवळ-जवळ सगळ्याच गोष्टींची उत्तर सापडतात. तसेच गुगल आपल्याला अशा अनेक गोष्टी पुरवते, ज्यामुळे आपलं जगणं सोपं झालं आहे. गुगल स्टोअर, जीमेल, युट्यूब, गुगल प्ले स्टोअर, गुगल मॅप ड्राईव, कॅलेंडर, कॉन्टॅक्ट, क्लासरुम इत्यादी. त्यापैकी सर्वात मोठ्याप्रमाणात वापर केला जातो तो म्हणजे Google Map चा, कारण गाडीने फिरायला जाताना किंवा कुठल्याही ठिकाणी पोहोचण्यासाठी Google Map आपल्याला गाईड करतं. ज्यामुळे आपल्याला कुठेही पोहोचणं सहज शक्य होतं. परंतु तुम्हाला माहितीय का की Google Map नेहमीच बरोबर नसतो. ते बऱ्याचदा गंडतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फिरायला गेलेल्या एका कुटूंबासोबत देखील असंच काहीसं घडलं, ज्याची आपण कल्पना सुद्धा करु शकत नाही.


ही घटना केरळमधील आहे. येथील चार जणांच्या कुटुंबाने गुगल मॅपला फॉलं केल्यामुळे, त्यांच्यासोबत ही धक्कादायक घटना घडली.


 हे कुटुंब एर्नाकुलमहून कुंभनाडला परतत असताना रात्री 10.30 च्या सुमारास हा अपघात झाला. पराचलमधील कोट्टायम जवळ त्यांनी एक वळण घेतलं आणि त्यांची गाडी रात्रीच्या अंधारात कालव्यात पडली.


काही तरी गडबड असल्याचे लक्षात येताच स्थानिक लोकांनी या कुटुंबाला मदत केली. कार आधीच 300 मीटर खाली गेली होती. तेथून गाडी घसरायला लागल्याने स्थानिक लोकांनी मदतीसाठी धाव घेत कुटुंबाच्या गाडीला दोरीने बांधले आणि त्यांना सुखरुप बाहेर काढले गेले.


परंतु गुगल मॅप या कुटूंबासाठी काळ बनून आलं होतं, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. ही घटना सर्वांसाठी एक उदाहरण म्हणून समोर आली आहे. ही घटना सर्वांन आता हेच सांगत आहे की, गुगल मॅपवरती अवलंबून न राहाता आपण काही गोष्टींची शाहनिशा केली पाहिजे, नाहीतर आपणच संकटात सापडू.