`डॅटसन`ची नवी `रेडिगो-१००० सीसी` कार लॉन्च
डॅटसनची `रेडिगो-१००० सीसी` नावाची कार लॉन्च करण्यात आलीय.
नवी दिल्ली : डॅटसनची 'रेडिगो-१००० सीसी' नावाची कार लॉन्च करण्यात आलीय.
कंपनीनं ही कार दोन व्हेरिएन्टमध्ये सादर केलीय. पहिली T आणि दुसरी S आहे. या कार रेड, सिल्व्हर, लाईम, ग्रे आणि व्हाईट या कलर व्हेरिएन्टमध्ये उपलब्ध आहे.
छोट्या कारच्या मार्केटमध्ये आपलं स्थान मजबूत करण्यासाठी डॅटसननं ही कार लॉन्च केलीय. या सेगमेंटमध्ये सध्या मारुती सुझुकीच्या अल्टो के १० चा दबदबा आहे.
Datsun Redi-Go 1Lt मध्ये कंपनीनं i-SAT (इंटेलीजेंट स्पार्क ऑटोमेटेड टेक्नोलॉजी) चा वापर केलाय. कारच्या या व्हर्जनमध्ये तीन सिलिंडर इंजिन लावण्यात आलंय.
कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार, या कारमध्ये लावण्यात आलेल्या नव्या मोटरमुळे ही गाडी २२.५ किलोमीटर प्रती लिटरचं मायलेज देईल.
जयपूरमध्ये या एक्स शोरूम किंमत ३.५७ लाख रुपये आहे. या बाईकची सर्वाधिक किंमत ३.७२ लाख रुपये आहे.