Whatsapp Scam: गेल्या काही वर्षांपासून सायबर काइमच्या घटना वाढल्या आहेत. सोशल मीडियाच्या अॅपद्वारे गुन्हेगार आपल्या आयुष्यात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. इंस्टंट मेसेजिंग म्हणून व्हाट्सअॅप लोकांमध्ये खूप पॉपुलर आहे. या अॅपचे जेवढे फायदे आहेत. तेवढेच या अॅपचा योग्य वापर केला नाही तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली पोलिसांनी पुन्हा नव्या घोटाळ्याचा इशारा दिला आहे. व्हाट्सअॅप यूजर्सला पर्सनल डिटेल्स शेअर करण्यास मनाई केली आहे. कारण या पर्सनल डिटेल्सचा वापर करुन यूजर्सकडून पैसे उळण्याचा धंदा सुरु झाला आहे. दिल्ली पोलिसांनी व्हाट्सअॅप यूजर्सला ट्वीटवर एक पत्रक शेअर केलं आहे. यात त्यांनी असा इशारा दिला आहे की, गेल्या काही दिवसांपासून अनेक फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनेत असं लक्षात आलं आहे की, टेलिकॉम सेवा देणाऱ्या MTNLचे नाव आणि लोगो वापरून व्हाट्सअॅप यूजर्सची फसवणूक केली जात आहे. 


नेमकं काय घडतं 


व्हाट्सअॅप यूजर्सला स्कॅमर्सकडून एक मेसेज येतो. हा मेसेज असा वाटतो की, जसा तो MTNLकडून आला आहे. या मेसेजमध्ये यूजर्सला KYC डिटेल्स अपडेट करायला सांगतात. या माहितीवरुन त्या यूजर्सचे सिम कार्ड ब्लॉक होणार नाही. यूजरचे सिम कार्ड ब्लॉक होऊ नये यासाठी त्वरित कॉल करण्यास या मेसेजमध्ये सांगितलं जातं. यूजर्सला घाबरवण्यासाठी ते हे पण दावा करतात की, तुमचं e-KYC सस्पेंड करण्यात आलं आहे. तसंच सिम कार्डला 24 तासांमध्ये ब्लॉक करण्यात येईल. 


हे करा आणि सतर्क राहा


या फसवणुकीपासून वाचण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. त्याशिवाय तुमची पर्नसल माहिती कधीही कोणाशीही शेअर करु नका, असाही सल्ला पोलिसांनी दिला आहे. याशिवाय कुठल्याही अनवेरिफाइड लिंकवर क्लिक करु नका. 


त्याशिवाय तुम्हाला माहिती नसलेले अॅप पण कधी मोबाईल फोनमध्ये डाउनलोड करु नका. तसंच MTNL आपल्या ग्राहकांकडून कधीही व्हाट्सअॅपवर  KYCबद्दल माहिती मागत नाही. त्यामुळे असे मेसेज जर तुम्हाला आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. तसंच असं काही घटना तुमच्यासोबत घडली असेल तर त्वरित जवळच्या पोलीस स्टेशनला याची माहिती द्या.