मुंबई : मोबाईल फोन अ‍ॅक्सेसरीजमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इअर फोन. इयरफोनशिवाय मोबाईल वापरण्याचा कोणी विचारही करू शकत नाही. कारण गाणं ऐकण्यापासून ते गेम खेळण्यापर्यंत आपल्याला सगळ्याच गोष्टींसाठी इअरफोन वापरावा लागतो. एवढेच काय तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांना फोनमध्ये सिनेमा बघण्याची सवय आहे. त्यात आता ओटीपी प्लॅटफॉर्मवरील सिनेमे देखील लोकं फोनवरती पाहू लागले आहेत, त्यामुळे उत्तम आवाजासाठी आणि स्पष्ट शब्द ऐकू येण्यासाठी लोकांना इअरफोन लागतोच. सुरूवातील साधे सरळ वायर वाले इअरफोन यायचे परंतु आता त्याचे अनेक प्रकार आले आहेत. जसे एअर पॉड, हेडफोन, ब्लूटूथ फोन इत्यादी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्या प्रकारात सर्वात स्वस्त इयरफोन हे वायर वाले असतात. हे इयरफोन स्वस्त असल्याने ते बऱ्याचदा लवकर देखील खराब होतात. या खराब इयरफोनचा आपल्याला काही वापर नसल्याने आपण त्याला कचऱ्यात (Desi Jugaad) फेकून देतो. परंतु तुम्हाला माहित आहे का, की, तुम्ही इयरफोन खराब झाले तरी त्याचा वापर करुन तुमचे संपूर्ण पैसे वसूल करु शकता.


यासाठी तुम्हाला देसी जुगाड करावा लागणार आहे. हा जुगाड तसा सोपा आहे आणि यासाठी (Desi Jugaad) तुम्हाला फक्त दोन ते तीन गोष्टींची गरज लागणार आहे.


आपल्याला इअरफोन्सचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो, जेणेकरून त्याच्या आतील तारा तुटू नयेत आणि बाहेरून देखील तो कापला जाऊ नये. परंतु तुम्ही कितीही चांगल्या प्रकारे इयरफोनला वापरलं तरी हे इयरफोन काही महिन्यांत खराब होतात. असे खराब इयरफोन फेकून देण्याऐवजी त्याचे काही जुगाड तुम्हाला सांगणार आहोत. ते जुगाड तुम्ही (Earphone Hacks) करुन पाहा तुम्हाला देखील तो आवडेल.


दागिने बनवा: जुन्या इयरफोनचे वायर वापरुन, त्यावर तुम्ही सुंदर रेशीम धागे गुंडाळून कानातील रिंग बनवू शकता. यामध्ये धाग्यांसह मणी वापरून देखील तुम्ही स्टाईलिश कानातले किंवा हेअर बँड बनवू शकता.


की-रिंग: इयरफोनच्या वायरला एकामागून एक गाठ मारा आणि एकात एक गुंतवा, तुम्ही त्यामध्ये मणीही टाकू शकता. अशा प्रकारे एक सुंदर की रिंग बनवु शकता, ज्याला तुम्ही चावीला लावून सुंदर की-चेन म्हणून वापरु शकता.


फोटो हॅन्गर: इयरफोनच्या वायरला तुमच्या आवडीचा शेप किंवा आकारात भिंतीला चिटकवा. ही वाय चिटकवण्यासाठी तुम्ही रंगीत टॅप्सचा वापर करु शकता. यावर, तुम्ही क्लिपच्या मदतीने फोटो लटकवू शकता. भिंतीला सुंदर आठवणीने सजवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.


ज्वेलरी हँगर: वायरला एकात एक गुंतवूण थोडं घट्ट करा, आणि एका जुन्या फ्रेममध्ये टाकून त्यात तुम्ही सजवा कानातले लटकवा. त्यावर तुम्ही तुमचा चष्मा देखील लटकवू शकता.


फ्लॉवर पॉट सजवा: जर तुम्ही तुमचे घरातील जुने फ्लॉवर पॉट पाहून कंटाळला असाल, तर फ्लॉवर पॉटभोवती इयरफोन वायर गुंडाळा आणि त्याला वेगवेगळा आकार द्या. त्यावर धागा, टेप, रिबीन इत्यादीं लावून तुम्ही एकदम नवीन फ्लॉवर पॉट बनवू शकता.