Meta Action : जुलै महिन्यात मेटा (Meta) कंपनीकडून फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 2.7 कोटी पोस्ट्सच्या विरोधात कारवाई करण्यासंबंधी प्रकरणे समोर आले आहेत. कंपनीने बुधवारी मासिक पारदर्शकता रिपोर्टमध्ये ही माहिती दिलीये. माहिती तंत्रज्ञान (मध्यवर्ती मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम, 2021 चं पालन केल्याबद्दल कंपनीने फेसबुकवरील 2.5 कोटी पोस्ट आणि इंस्टाग्रामवरील 20 लाख पोस्टवर कारवाई केली.


'मेटा'ने कारवाई का केली?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूज एजन्सीनुसार, कंपनीने सांगितलंय की फेसबुकवरील 1.73 कोटी स्पॅम कंटेंटवर कारवाई करण्यात आली आहे, त्यानंतर 'adult nudity and sexual activity' संबंधित 27 लाख पोस्ट आणि 'Violent and graphic content' संबंधित 23 लाख पोस्ट आहेत,  ज्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.


सोशल मीडियाच्या क्षेत्रातील दिग्गज असलेल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम  या कंपन्या 'मेटा'च्या मालकीच्या आहेत आणि भारतातील नवीन आयटी कायद्यानुसार, फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अक्षेपार्ह्य पोस्ट करणं प्रतिबंधित आहे. तुम्हालाही तुमच्या अकाउंटसंबंधी कोणतीही कारवाई होऊ द्यायची नसेल, तर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या नियमांनुसार आणि प्रायव्हसीचा विचार करुन पोस्ट करा.


अशी पोस्ट फेसबुक आणि इंस्टाग्रामवर चुकून करू नका


तुम्ही फेसबुकवर एखाद्याला धमकावलं किंवा भडकाऊ भाषण केलं किंवा बोललात तर ते तुमच्यासाठी अडचणीचं ठरू शकतं. असं केल्यास कंपनीच्याकडून तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते.


याशिवाय, फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्रामवर (Instagram) भडकाऊ भाषण, आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणंही टाळावं. समाजात दंगली भडकतील अशा पोस्ट टाकणे टाळा. या पोस्टमुळे फेसबुक तुमचं अकाउंट ब्लॉक होऊ शकतं.