आयफोनवर मिळतोय डिस्काऊंट, बघा ऑफर्स
तुम्ही जर आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे.
मुंबई : आयफोन घेण्याची अनेकांची इच्छा आता पूर्ण होणार आहे. कारण आयफोनवर सुरू असलेल्या मोठ्या डिस्काऊंटमूळे हे स्वप्न आवाक्यात येणार आहेत.
तुम्ही जर आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे.
'अॅपल फेस्ट'
ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉनवर 'अॅपल फेस्ट' सुरू आहे.
यामध्ये आयफोन ८, आयफोन ८ प्लस, आयफोन ७ प्लस आणि आयफोन एसई यासारख्या अनेक मॉडेल्सवर उत्तम ऑफर उपलब्ध आहेत. पहा, काय मिळत आहे, सवलत किती आहे ..
३,३१५ रुपये सूट
आयफोन ८ प्लस ६४ जीबी व्हरिएंटवर ३,३१५ रुपये सूट मिळत आहे. याची खरी किंमत ६९,६८५ रुपये असून ४,६१० रुपयांच्या डिस्काऊंटनंतर ही किंमत ५९,३९० रुपये झाली आहे.
७ हजारांची सूट
आयफोन ७ चे ३२ जीबी व्हॅरिएंट्सर ७ हजार रुपयांच्या डिस्काऊंटनंतर आणि ४१,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
४,००१ रुपये सूट
आयफोन ७ प्लसला ४,००१ रुपये सूट मिळत आहे, ज्यानंतर हा ५४,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.
३६,९९९ रुपयांची सूट
३००१ रुपयांच्या डिस्काऊंट ऑफरमूळे आयफोन ६ एस ३६,९९९ रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.
२५,९९० रुपयांची सूट
आयफोन ६ वर ३,५१० रुपये सूट मिळत असल्याने हा २५,९९० रुपयात उपलब्ध आहे.
६ हजारची सूट
आयफोन एसईवर ६ हजारची सूट मिळत आहे हा आयफोन मॉडेल २० हजार रुपयात आहे.
९ डिसेंबरपर्यंत ऑफर
९ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या फेस्टमध्ये एक्स्चेंज स्किम आणि नो कॉस्ट ईएमआयच्या ऑफर्सही आहेत.
२ हजारांची सूट
एवढच नव्हे, कोणत्याही मॉडेलच्या खरेदीनंतर एच.डी.एफ.सी यूजर्सना २ हजार रुपयांचे डिस्काऊंटही मिळणार आहे. ही ऑफर ईएमआय ऑप्शन निवडल्यानंतरच लागू होणार आहे.