मुंबई : पैशांच्या अफरातफरीच्या अनेक धक्कादायक घटना तुमच्याही समोर आल्या असतील. केवळ ऑनलाईन माध्यमातून हा गंडा घातला जातो का? तर नाही... यासाठी तुमच्या एटीएम कार्डाचीही सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे. यासाठीच देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयननं एटीएम वापरकर्त्यांना काही फायद्याच्या गोष्टी सांगितल्यात. ग्राहक कुठल्याही पद्धतीच्या फ्रॉडचा शिकार होऊ नयेत, यासाठी एसबीआयनं काही टीप्स दिल्यात. 


इतरांच्या गोपनीयतेचा आदर करा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जशी तुमची सुरक्षितता महत्त्वाची आहे तशीच इतरांचीही... त्यामुळे एटीएम ट्रान्झॅक्शन करताना कोणत्याही इतर ग्राहकाच्या खांद्यावरून नजर ठेऊ नका. त्या ग्राहकाच्या गोपनियतेचा आदर करा... ही सूचना न पाळणाऱ्या इतरांनाही हा सल्ला द्यायला विसरू नका. ही सूचना न पाळणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होऊ शकते


अनोळखी लोकांपासून सावधान


एटीएमवरून पैसे काढताना अपरिचीत लोकांपासून सावध राहा. एटीएममधून पैसे काढताना आपल्या आजूबाजूला अपरिचित व्यक्ती नाहीत ना? याची खात्री करून घ्या...


एटीएमची पडताळणा करा


तुम्ही पैसे काढत असलेल्या एटीएमवर एखादं बाह्य संदिग्ध उपकरण तर नाही ना? याची खात्री करून घ्या...


एटीएम पीन शेअर करू नका


तुमचा एटीएम पीन क्रमांक कोणत्याही परिचित किंवा अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करू नका... एटीएम क्रमांक दाबताना अपरिचित लोकांपासून सावध राहा


ट्रान्झॅक्शन पूर्ण होऊ द्या


एटीएम वापरल्यानंतर ट्रान्झॅक्शन पूर्ण होऊ द्या... ही प्रक्रिया पूर्ण झालीय याची खात्री झाल्यानंतर पैसे ताब्यात घ्या... आणि त्यानंतर मशीनवर आपल्या अकाऊंटवरून एक्झिट केल्यानंतरच बाहेर पडा