मुंबई : WhatsAppचा वापर आपण चॅट करण्यासाठी आणि एकमेकांना डॉक्युमेंट्स देखील शेअर करतो. त्यावेळी तुम्ही शेअर करत असलेल्या फाईल वरती पाहिले असेल की, एक विशिष्ट प्रकारचा कोड येतो. तर तुम्ही कधी विचार केलाय का की हा नंबर का लिहिलेला असतो? तो नंबर का येतो? याचा अर्थ नक्की काय आणि ते कसे येतात? आज आम्ही तुम्हाला याबद्दल काही माहिती सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता WhatsApp जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनत आहे आणि लोक चॅटसह फोन आणि व्हिडीओ कॉलसाठी WhatsAppचा सहारा घेत आहेत. WhatsApp चा वापर फोटो, व्हिडीओ यांसारखे अटॅचमेंट पाठवण्यासाठी केला जात आहे. बरेच लोक डॉक्युमेंटच्या फॉरमॅटमध्ये फोटोही पाठवतात, जेणेकरून फोटो पाठवल्यानंतर त्याची क्वालिटी खराब येऊ नये.


खरेतर डॉक्युमेंट फाईलवर दिसणारा हा कोड नंबर खूप उपयुक्त आहे आणि त्या फाईलशी संबंधित बरीच माहिती त्यात दडलेली आहे. तसेच, त्या नंबरवरूनच तुम्हाला बरेच काही कळू शकते.


हा नंबर म्हणजे एक प्रकारे फाईलचे नाव आहे. तुमच्या डिव्हाइसमधील त्या फाइलचे नाव येथे दिसते. पण, फार कमी लोक फोनमध्ये विशिष्ट नावाने फोटो सेव्ह करतात, त्यामुळे नाव नसल्यास हा कोड त्यावर दिसू लागतो.


हा कोड YYYYMMDD_HHMMSS स्वरूपात लिहिलेला आहे. जर 20210905_100714 असेल तर याचा अर्थ ही फाईल 5 सप्टेंबर 2021 ची आहे. यासोबतच पुढे वेळेचीही माहिती देण्यात येते.