COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : यूट्यूबवर ना ना तऱ्हेचे व्हिडीओ ट्रेन्ड होत असतात, असाच एका कुत्र्याचा आणि एका महिलेचा व्हिडीओ ट्रेन्ड होत आहे, यात मालकीण करेल त्या प्रकारचा योगा हा कुत्रा करतोय.


हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. यात अगदी योगासाठी चटई आणण्यापासून हा कुत्रा योगाला सुरूवात करतो. 


या व्हिडीओत कुतूहल एवढंच आहे, प्राणी माणसाच्या सहवासात आला, तर तो अनेक गोष्टी जशाच्या तशा करायला लागतो, यात योग करणे म्हणजे आणखीन वेगळं काही, कारण अनेकांना आजही योगा करणं म्हणजे कठीण काम वाटतं.