Dosa Printer Machine Viral Video: तंत्रज्ञानाच्या युगात सर्व गोष्टी एका क्लिकवर झटपट मिळत आहेत. संवाद साधणं देखील सोपं झालं आहे. येत्या काही वर्षात स्वयंपाक देखील इतक्या झटपट मिळेल असं कुणी म्हणालं वावगं ठरणार आहे. कारण स्वयंपाक करणाऱ्या अनेक मशिन आतापासूनच बाजारात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे भविष्यात किचनमधील कामाचा व्याप कमी होईल, असं म्हणता येईल. आतापर्यंत तुम्ही पेपर प्रिंटर पाहिलं असेल. पण जर तुम्हाला या प्रिंटरमधून गरमागरम डोसा मिळेल असं सागितलं तर, कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण सोशल मीडियावर डोसा प्रिंटरची जोरदार चर्चा आहे. या प्रिंटरमधून एका क्लिकवर तयार डोसा मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसं पाहिलं तर डोसा तयार करणं कौशल्याचं काम आहे. डोसा करणं प्रत्येकाला जमेल असं नाही. कधी कधी डोसा तव्यावर चिकटतो, तर कधी कधी मधेच तुटून जातो. पण या मशिनच्या माध्यमातून डोसा तयार करणं सोपं आहे. डोसा प्रिंटर मशिन चपाती आणि पापड बनवणाऱ्या मशिनसारखी आहे. डोसा प्रिंटरमध्ये डोसाचं पीठ टाकावं लागेल. त्यानंतर बटण क्लिक करताच काही मिनिटात डोसा तयार होऊन बाहेर येईल. ही डोसा प्रिंटर मशिन 15-16 हजार रुपयात उपलब्ध असल्याचं बोललं जातं आहे.



काही दिवसांपूर्वी एका कंपनीने डोसा प्रिंटर नावाने ही मशिन लाँच केली आहे. या मशिनच्या माध्यमातून डोसा झटपट तयार होत असल्याने नेटकरी आवाक झाले आहेत. आतापर्यंत सोशल मीडियावर हा व्हिडीओ हजारो लोकांनी पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.