मुंबई : देशात जिओ लॉन्च झाल्यानंतर इतर कंपन्यांना आपलं अस्तित्व टिकवणं कठीण झालं आहे. जिओने आपल्या वेगवेगळ्या आकर्षक प्लॅनने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केलं. पण काही कंपन्या अजूनही आपल्या युजर्सला टिकून ठेवण्यासाठी वेगवेगळे प्लॅन लॉन्च करत असतात. जाणून घेऊया असेच काही प्रीपेड प्लॅन.


वोडाफोन 299 रुपयाचा प्लॅन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वोडाफोनच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळायचा, परंतु सध्या युजर्सला 4 जीबी डेटा मिळत आहे. याशिवाय येथे अमर्यादित कॉल, दररोज 100 एसएमएस आणि इतर फायदे देखील आहेत. ऑफर मर्यादित वेळेसाठी आहे. याची वैधता 28 दिवसांची आहे.


वोडाफोन 449 रुपयाचा प्लॅन


449 रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजरला दररोज 2 + 2 जीबी डेटा मिळतो. याशिवाय येथे अमर्यादित कॉल, दररोज 100 एसएमएस आणि इतर फायदे आहेत. प्लॅनची वैधता 56 दिवसांची आहे.


आयडिया 399 रुपयांचा प्लॅन


आयडिया प्रीपेड ग्राहकांना 399 रुपयांच्या रिचार्जवर दररोज 1 + 1 जीबी डेट देत आहे. यासह अमर्यादित कॉलिंगसह, आपल्याला दररोज 100 एसएमएस मिळतात. याची वैधता 84 दिवसांची आहे.


वोडाफोनचा 699 रुपयांचा प्लॅन


या प्लॅनमध्ये ही युजरला 2 + 2 जीबी डेटा मिळतो. या योजनेची वैधता 84 दिवसांची आहे. याशिवाय येथे अमर्यादित कॉल, दररोज 100 एसएमएस आणि इतर फायदे आहेत.


आयडिया 199 रुपयांचा प्लॅन


199 रुपयांच्या रिचार्जवर दररोज 1.5 + 1.5 जीबी डेटाचा लाभ घेऊ शकतात. तसेच अमर्यादित कॉल आणि 100 एसएमएस देखील मिळतात. याची वैधता 28 दिवसांची आहे.