मुंबई : तुम्ही जर दिवसांतला जास्तीत जास्त वेळ फेसबुकवर घालवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे...


'फेसबुक'वरून कमाई 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुकवर टाईमपाससोबतच तुम्ही घरबसल्या कमाईही करू शकता, हे तुम्हाला माहीत आहे का? यासाठी तुम्हाला सर्वप्रथम फेसबुकवर एक पेज तयार करावं लागेल. त्यानंतर हे पेज तुम्हाला वेळोवेळी अपडेटही ठेवावं लागणार आहे. जेवढी तुमची पोहच वाढेल तेवढे जास्त कमाई तुम्ही करू शकाल. 


आपल्या बिझनेसची मार्केटिंग करण्याचा हा एक उत्तम पर्यायही आहे. यासाठी तुम्हाला फेसबुकचा 'अॅडव्हान्स युझर' बनावं लागेल. यासाठी फेसबुककडून तुम्हाला एक इन्व्हिटेशन मिळेल. तुमच्या फेसबुक पेजचा वापर जास्त असेल तर तुमच्या पेजला जाहिराती मिळणं सुरू होईल... आणि यातूनच तुम्ही कमाई करू शकाल.


काय कराल?


फेसबुकचा अॅडव्हान्स युझर बनल्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल. अॅडव्हान्स युझर बनल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. यामध्ये तुम्हाला आपल्या बँक अकाऊंटची माहिती भरावी लागेल. फॉर्म भरल्यानंतर तुमचं अकाऊंट ४८ तासांच्या आत अॅक्टिवेट होईल. 


जसजशी तुमच्या पेजची रीच आणि लाईक्स वाढतील तशी तुमची कमाईही वाढेल. त्यासाठी तुम्हाला वेळोवेळी नव्या पोस्ट टाकून आपलं फेसबुक पेज अपडेट ठेवावं लागेल.