Electric Bill : थंडीचे दिवस गायब झालेत. आतापासूनच उकडा वाढला आहे. एसीची गरज भासू लागली आहे. त्यात विजेचे बिल जास्त येत असल्याने टेन्शन वाढले आहे. (Free Electric Bill) आधीच विजेचे दर वाढले असून विजबिलही जास्त येत आहे. त्यामुळे तुम्ही प्रचंड वीजबिल भरुन हैराण झाला असाल तर आता तुमचे एक छोटे उपकरण सुटका करु शकणार आहे. यामुळे आता तुम्हाला बिल भरण्याची गरज भासणार नाही. कारण आता तुमच्या घराची वीज पूर्णपणे फ्री होणार आहे. तुम्हाला धक्का बसला असेल ना. पण हे शक्य आहे. (Electric Bill Reduce) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही हे छोटे डिव्हाइस वापरल्यानंतर तुम्हाला घराच्या वीज खर्चात मोठी कपात होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तुम्हाला कमी बिल भरावे लागेल, त्यासाठी तुम्हाला हे मशिन घराच्या छतावर बसवावे लागेल. जर तुम्ही विचार करत असाल की आम्ही सौर पॅनेलपासून वीजबिल मोफत बनवण्याविषयी बोलत आहोत, तर तुम्ही चुकीचे आहे. कारण तसे काहीही नाही. आज आम्ही तुम्हाला या नवीन मशिनबद्दल सांगणार आहोत. तुम्ही तुमच्या घरात दर महिन्याला फक्त एकच उपकरण कसे सहज वापरु शकता ते. येणारे वीज बिल कायमचे बंद होईल आणि त्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करण्याची गरज नाही. 


हे डिव्हाइस कोणते आहे ?


तुम्हाला या डिव्हाइसबद्दल जाणून घ्यायचे असेल तर लगेच जाणून घ्या. याला ट्यूलिप टर्बाइन (Tulip Turine) म्हणतात. याच्यामाध्यमातून तुम्ही तुमच्या घरी बसवून वीज निर्माण करु शकता आणि त्यातून निर्माण होणारी वीज इतकी आहे की तुम्हाला तुमच्या संपूर्ण घराचे वीज बिल मोफत होण्यास मदत होणार आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला वीज कनेक्शन घेण्याची अजिबात गरज नाही. दरवर्षी तुम्ही साधारणपणे  50000 ते  100000 रुपये वीज बिलावर खर्च करता, ते पूर्णपणे वाचणार आहेत.


आनंद महिंद्रा हेही पडले या उपकरण्याच्या प्रेमात


हे मशिन पाहून खुद्द आनंद महिंद्रा सुद्धा आश्चर्यचकित झालेत. त्यांनी या मशिनचे कौतुक केले आहे. हे मशिन बसवल्यानंतर तुम्हाला विजेची अडचण सहज दूर करता येते, ते बसवल्यानंतर वीज बिलही दूर करता येते. आम्ही तुम्हाला सांगतो की हे मशीन बसवण्याची किंमत लाखोंमध्ये आहे, परंतु ती एकदाच गुंतवणूक करायची आहे. तुम्हाला सुमारे 15 ते 20 वर्षे वीज बिलाचा विचार करण्याची गरज नाही. घरच्या घरी ट्यूलिप टर्बाइन बसवा. ते बसविणे खूप सोपे आहे आणि त्याच्या मदतीने तुम्ही वीज बिल मोफत मिळवू शकता.