Elon Musk ने ट्विटर युजर्ससाठी एक चांगली बातमी दिली आहे. त्यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून रोज नवीन निर्णय घेण्याचा धडाकाच सुरु केला आहे. Twitter च्या डायरेक्ट मेसेजिंग (डीएम) फीचरमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल आणणार आहे. ज्यामध्ये एनक्रिप्टेड डीएमचा समावेश आहे. Twitter ने  दोन नवीन फीचर लॉन्च केली आहेत. DM रिप्लाय आणि DM साठी नवीन इमोजी पिकरही असणार आहे. तसेच आता Twitter वरुन कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंग करता येणार आहे.


तुम्हाला कोणती मिळणार फीचर्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Twitter ने मंगळवारी कंपनीच्या सपोर्ट अकाउंटवरुन एक ट्विट करण्यात आले आहे. यामध्ये अधिक माहिती देण्यात आलेली आहे. या ट्विटमध्ये डीएम रिप्लायसोबत युजर्स आता डीएममध्ये मिळालेल्या संदेशाला रिप्लाय देऊ शकतात. तसेच सहज बोलू शकतात. कंपनीने डीएमसाठी नवीन इमोजी पिकरही जोडले आहे. यामुळे तुम्ही पहिल्यापेक्षा जास्त इमोजी वापरुन तुम्ही संदेश तसेच तुमची प्रतिक्रिया संदेश शेअर करु शकता. 


काय म्हटलेय Elon Musk यांनी !


Elon Musk यांनी मंगळवारी प्लॅटफॉर्मवर येणार्‍या कॉल आणि एन्क्रिप्टेड मेसेजिंगसह नवीन फीचर्सबद्दल तपशील उघड केला. ते म्हणाले, ट्विटर युजर्स इमोजीसह थ्रेडमधील कोणत्याही संदेशाला थेट उत्तर देऊ शकतात. याशिवाय मस्कने असेही सांगितले आहे की, ट्विटर आगामी काळात त्यांच्या प्लॅटफॉर्मवर व्हॉईस आणि व्हिडिओ चॅट सुरु करणार आहे. याशिवाय, Elon Musk यांनी ट्विट देखील केले आहे की, 'अ‍ॅपच्या नवीन आवृत्तीसह, तुम्ही थ्रेडमधील कोणत्याही संदेशाला उत्तर देऊ शकता  आणि कोणतीही इमोजी प्रतिक्रिया वापरु शकता. ते पुढे म्हणाले की एन्क्रिप्टेड डीएम आवृत्ती 1.0 चे प्रकाशन होईल. जे आणि ते जलद परिष्कृत केले जाईल असे आश्वासन दिले.



Elon Musk पुढे म्हटलेय, माझ्या डोक्यावर बंदूक ठेवूनही मी तुमचा डीएम पाहू शकत नाही. लवकरच तुमचे हँडल या प्लॅटफॉर्मवर कोणाशीही व्हॉइस आणि व्हिडिओ चॅट करण्यास सक्षम असेल, ज्यामुळे तुम्ही फोन नंबर न देता जगातील कोठेही लोकांशी बोलू शकता .DM ची सुविधा आज 11 मे पासून सुरु होणार आहे.