नवी दिल्ली : भारतात मोठ्या संख्येने लोक सोशल मीडियाचा वापर करतात. देशात सोशल मीडिया युजर्सची संख्या 50 कोटीहून अधिक आहे. सोशल मीडिया मार्केटमध्ये विदेशी कंपन्या अधिकाधिक आहेत. मात्र आता भारताचं एक देसी ऍप लॉन्च करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांच्याहस्ते रविवारी भारतातील पहिलं देसी सोशल मीडिया ऍप Elyments लॉन्च केलं आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर डेटा प्रायव्हसीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. त्यामुळे या देसी सोशल मीडिया ऍपमध्ये डेटा प्रायव्हसीबाबत अधिक लक्षकेंद्रीत करण्यात आलं आहे. Elyments ऍपमध्ये यूजरचा डेटा सुरक्षित राहणार असून कोणाच्याही परवानगीशिवाय तिसरी पार्टी डेटा घेऊ शकत नसल्याचं, सांगण्यात आलं आहे.



Elyments ऍप गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करता येऊ शकतं. हे ऍप लाखहून अधिक लोकांनी डाऊनलोड केलं आहे. हे ऍप 8 भाषांमध्ये उपलब्ध आहे. यात ऑडिओ, व्हिडिओ कॉलिंगचीही सुविधा देण्यात आली आहे. 


भारताला ऍप्स आणि सोशल मीडिया यांसारख्या गोष्टींमध्येही आत्मनिर्भर बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या महिन्यात लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या भारत चीन हिंसक झडपेनंतर भारत-चीनमधील संघर्ष टोकाला गेला आहे. चीनविरोधात मोठं पाऊल उचलत भारताने चीनच्या 59 ऍप्सवर बंदी घातली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना ऍप्स बनवण्यासाठी चॅलेंजही दिलं आहे.