नवी दिल्ली : बंगळूरुस्थित दुचाकी स्टार्टअप कंपनी Emflux Motors लवकरच देशातील पहिली इलेक्ट्रिक सुपरबाईक बाजारात आणत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या २०१८ ऑटो एक्सपोमध्ये ही सुपरबाईक लाँच केली जाण्याची शक्यता आहे. कंपनीकडून Emflux Model 1 नावाची बाईक लाँच केली जाईल. 


या बाईकचा स्पीड 200km/hपर्यंत वाढू शकतो. मात्र ३ सेकंदात ही बाईक १०० किमी प्रति तास वेग पकडू शकते. इंजिनबाबत बोलायचे झाल्यास यात लिक्विड कूल्ड AC इंडक्शन मोटार देण्यात आलीये. यात सॅमसंगच्या लिथियम आयर्न बॅटरी आहेत. 


या सुपरबाईकमध्ये दोन चॅनेलवाला एबीएस, ७ इंचाचा टीएफटी डिस्प्ले, जीपीएस नेव्हिगेशन, ऑटो अपडेट, मोबाईल अॅप आणि बाईक टू बाईक कनेक्टिव्हिटी देण्यात आलीये. ही बाईक दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. एक १५० किमीच्या रेंजमधील तर दुसरी बाईक २२० किमी रेंजमधील असेल. या बाईकची किंमत ५-६ लाख रुपये असू शकते.