देशात इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना चांगली मागणी आहे. इंधनाचे वाढते दर लक्षात घेता लोक आता इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत. यामुळे अनेक दिग्गज कंपन्या स्पर्धेत उतरल्या असून बाजारात एकापेक्षा एक मॉडेल लाँच करत आहेत. दुसरीकडे अनेक स्टार्टअप कंपन्याही स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशची कंपनी एनिग्मा ऑटोमोबाइल्सने बाजारात आपली नवी इलेक्ट्रिक स्कूटर Ambier N8 लाँच केली आहे. ही एक हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे जिची किंमत 1.5 लाख रुपयांपासून ते 1 लाख 10 हजारांपर्यंत (Ex Showroom) आहे. किंमत आणि रेंजमध्ये ही स्कूटर OLA आणि ATHER ला स्पर्धा देत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Ambier N8 मध्ये कंपनीने 1500 व्हॉल्टच्या क्षमतेच्या BLDC इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 40 ते 50 किमी आहे. या स्कूटरमध्ये 63 व्हॉल्ट 60AH क्षमतेची बॅटरी मिळते. कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 200 किमीपर्यंत ड्रायव्हिंर रेंज देते. याची बॅटरी फूल होण्यासाठी जवळपास 4 तास लागतात.


Ambier N8 इलेक्ट्रिक स्कूटरचं वजन 220 किलोग्रॅम आहे. तसंच ही स्कूटर 200 किलोपर्यंतचं वजन वाहून नेऊ शकते. यामध्ये 26 लीटरचा बूट स्पेस मिळतो आणि व्हीलबेस 1290 मिनी आहे. या स्कूटरमध्ये मोठा फूटबोर्ड मिळतो, जो रायडरला पाय ठेवण्यासाठी मुबलक जागा देतो. याशिवाय मागील प्रवाशासाठी पिलन रायडरही देण्यात आलं आहे. 


फिचर्स काय आहेत?


या स्कूटरमध्ये 130 मिमीचा फ्रंट टेलेस्कोपिक फॉर्क सस्पेन्स देण्यात आला आहे. तसंच मागील बाजूला स्प्रिंग सस्पेंशन मिळतं. स्कूटरमध्ये कनेक्टिव्हिटी फिचर देण्यात आलं आहे, जे तुम्ही कंपनीच्या एनिग्मा ऑन (ENIGMA ON) कनेक्ट अॅपवरुन ऑपरेट करु शकता. यामध्ये सेंट्रल लॉकिंग सिस्टम, एंटी थेफ्ट अलार्म, कीलेस एंट्री, फाइंड माय स्कूटर, युएसबी पोर्ट, मोटर वॉकिंग असिस्ट, रिव्हर्स मोड, जिओ फेन्सिंग आणि ब्ल्यूटूथ कनेक्टव्हिटी असे फिचर देण्यात आले आहेत. 


Ambier N8 एकूण पाच रंगात उपलब्ध आहे. ज्यामध्ये ग्रे, व्हाइट, ब्ल्यू, मॅट ब्लॅक आणि सिल्व्हर कलर हे पर्याय मिळतात. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन ही स्कूटर बूक करु शतात. कंपनीने बॅटरीसाठी 3 वर्षांची वॉरंटी दिली आहे.