Facebook आणि Twitter बदलणार, पाहा काय होणार मोठा बदल
ऑगस्टपासून फेसबुक आणि ट्विटर बदलणार आहे. यावेळी काय मोठा बदल होणार आहे याची उत्सुकता आहे.
मुंबई : ऑगस्टपासून फेसबुक आणि ट्विटर बदलणार आहे. यावेळी काय मोठा बदल होणार आहे याची उत्सुकता आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook ) आणि ट्विटर ( Twitter) यूजर्समध्ये खूप लोकप्रिय आहेत. देश आणि जगाशी संबंधित अपडेट आणि नवीन माहितीनुसार Facebook आणि Twitterमध्ये नवीन बदल होणार आहे. त्यानुसार या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करण्याची सुविधा मिळणार आहे.
परंतु पुढच्या महिन्यापासून म्हणजेच ऑगस्टपासून Facebook आणि Twitter या दोन प्लॅटफॉर्मशी संबंधित नियमांमध्ये काही मोठे बदल होणार आहेत. (Facebook and Twitter will change from August) त्याचा थेट परिणाम यूजर्सवर दिसून येईल. ट्विटरचे ( Twitter)एक विशेष फीचर Fleetऑगस्ट महिन्यापासून बंद होणार आहे. त्याचबरोबर, फेसबुकवर देखील पेमेंटचे फीचर जोडणार आहे. आम्हाला फेसबुक आणि ट्विटरमधील बदलांविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया.
Twitterचे फीचर Fleet बंद केले जाईल
ऑगस्टमध्ये यूजर्सना मोठा धक्का देत ट्विटरने आपले Fleet फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर, यूजर्सना या फीचरचा आनंद घेता येणार नाही. फ्लीट फीचरबद्दल बोलायचे झाले तर ते आपोआप 24 तासात फोटो किंवा मजकूर अदृश्य करत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की बहुतेक लोक त्यांच्या ट्विटरचा रिच वाढविण्यासाठी आणि जाहिरात वाढवण्यासाठी फ्लीट फीचरचा वापर करीत होते. त्यामुळे कंपनीने 3 ऑगस्टपासून हे फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.