नवी दिल्ली : फेसबुककडून बुधवारी नवं अकाऊंट सुरू करण्यासाठी आधार कार्डवरील नाव मागितलं जात होतं. यामुळे यूजर्सकडून अनेक शंकाकुशंका व्यक्त केल्या गेल्या. पण आता फेसबुकने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 


काय म्हणालं फेसबुक?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुकचे प्रॉडक्ट मॅने जर तैची होशिनो यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे की, ही एक छोटीशी टेस्ट होती आणि ती आता संपली आहे. पण ते हेही म्हणाले की, जर तुम्ही तुमचं आधारवरील नाव द्याल तर तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना तुम्हाला शोधण्यास सोपं होईल.


नाही लागणार आधार


यावरून हे स्पष्ट होतं की, फेसबुक आधार डेटा कलेक्ट करत नाहीये आणि फेसबुक यूजर्सला आधार देण्याची काहीच गरज नाहीये. यावर होशियो म्हणाले की, ‘या टेस्टचा उद्देश एकच होता की, लोक आपल्या ख-या नावाने साइन अप करणे समजावे. आणि याने तुमचे मित्र आणि परिवारातले लोक तुम्हाला तुमच्या ख-या नावानेच ओळखावे.


काय होती टेस्ट?


बुधवारी अनेक युजर्सना साइन अप करतेवेळी दिसले की, साइन-अप करण्यासाठी फेसबुक आधार कार्ड्वरील नावाची मागणी करत होतं. फेसबुकने आता स्पष्ट केलं आहे की, फेसबुक याप्रकारचं फिचर आणणार नाहीये. या टेस्टमध्ये केवळ आधार वरील नाव मागण्यात आले होते. इतर कोणतीही माहिती द्यायची नव्हती.