Facebook जगात रविवारी डाऊन, न्यूज फीड आणि नोटीफिकेशनला अडचणी
जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म facebook रविवारी चर्चेत आलं. कारण अमेरिका, ब्रिटनसह युरोप एवढंच नाही
मुंबई : जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म facebook रविवारी चर्चेत आलं. कारण अमेरिका, ब्रिटनसह युरोप एवढंच नाही तर आशिया खंडातील काही भागात रविवारी फेसबूक पुन्हा एकदा ठप्प झालं. यामुळे फेसबूक वापरणाऱ्यांना न्यूज फीड आणि नोटिफिकेशन मिळत नव्हते.
डाऊन डिटेक्टरवर दिलेल्या रिपोर्टनुसार, ४ हजार युझर्सच्या तक्रारी आल्या की, त्यांना न्यूज फीड दिसत नाही आणि नोटीफिकेशन येत नाही, फेसबूकवर त्यांना न्यूज फीड आणि नोटीफिकेशन पाहण्यास अडचणी येत आहेत.
फेसबूकने आपल्या सर्वर स्टेटस पेजवर लिहिलं आहे, आम्हाला सध्या खराब प्रदर्शनाचा सामना करावा लागत आहे. यात आणखी वेळ जावू शकतो. आयएनएसने दिलेल्या बातमीनुसार, फेसबूकने म्हटलं आहे की, आमची टीम याच्यावर काम करीत आहे. twitter युझर्सने नाराजी व्यक्त केली आहे.
एक फेसबूक युझरने लिहिलं आहे, फेसबूक ठप्प झालं आहे, तर मी ट्वीटरवर जावून पाहतो की, हे फक्त माझ्या सोबतच नाही ना झालं? कुणी एकाने ट्वीट केलं. फेसबूकचे माझे सर्व नोटीफिकेशन्स गायब झाले आहेत. असं सर्वांसोबत झालं आहे का?
फेसबूक आणि इन्स्टाग्राम मागील वर्षी देखील ठप्प झालं होतं. यामुळे लोक खूप चिंतेत होते कारण ते कोणतीही पोस्ट करू शकत नव्हते.