नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्यासाठी डिजिटल स्किल्सना डेव्हलप करण्याची योजना आखली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठी फेसबुकने भारतात डिजिटल ट्रेनिंग हब आणि स्टार्टअप ट्रेनिंग हब सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. याद्वारे फेसबुक देशात ऑनलाईन माध्यमातून लहान बिझनेस आणि सर्वसामान्य नागरिकांना डिजिटल स्किल्स शिकवण्यास मदत करेल. भारतात पहिल्यांदाच अशा हबची सुरूवात होणार आहे.


काय आहे प्लॅन?


डिजिटल ट्रेनिंगसाठी https://digitalskills.fb.com ही वेबसाईट आणि स्‍टार्टअप ट्रेनिंगसाठी https://startups.fb.com ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. यात तुम्हाला तुमच्या गरजांनुसार माहिती मिळेल. 


- फेसबुकच्या या योजनेचा उद्देल २०२० पर्यंत भारतात ५ लाखांपेक्षा जास्त लोकांना प्रशिक्षित करणे आहे. 


- फेसबुकचे ऑनलाई ट्रेनिंग हब लोकांना डिजिटल स्किल्स आणि ट्रेनिंग देणार आहेत. 


- सोबतच इंटरप्रोन्योन्सना बिझनेस सुरू करण्यासाठी आणि सुरू असलेल्या व्यवसायांना इंटरनेटच्या माध्यमातून जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यास मदत करेल. 


कुणासोबत केलं टायअप?


फेसबुकने आपल्या या योजनेसाठी डिजिटल विद्या, ईडीआयआय, धर्मा लाईफ आणि स्टार्टअप इंडिया सारख्या स्थानिक कंपन्यांसोबत मिळून अभ्यासक्रम तयार केलाय. हा अभ्यासक्रम मोबाईलवर हिंदी आणि इंग्रजी भाषेद उपलब्ध होईल. 


कशी होईल मदत?


फेसबुक डिजिटल ट्रेनिंग हबच्या माध्यमातून लोकांना सोशल मीडिया बेसिक्स, डिजिटल चॅनलवर ऑडिअन्स तयार करणे, पर्सनल ब्रॅन्डींगसारखे स्किल्स शिकवणार आहे. तसेच डेव्हलपर्स आणि टेक स्टार्टअपना चांगले प्रॉडक्ट्स, बिझनेस उभा करण्यात मदत करतील. या अभ्यासक्रमात बिझनेस प्लॅन तयार करणे, मार्केट रिसर्च, हायरिंग, फंडींग आणि बिझनेस पुढे कसा नेणार हे शिकवलं जाणार आहे.