तुमच्या मुलाला फेसबुकचे व्यसन लागलयं ? चिंता करु नका
फेसबुक लहान मुलांसाठी एक विशेष चॅट अॅप आणत आहे. या चॅट अॅपचा कंट्रोल पालकांकडे असणार आहे.
नवी दिल्ली : तुमच्या पाल्याचे फेसबुक अकाऊंड आहे का ? त्याचा जास्त वेळ फेसबुकवरच जातोय का ? तर मग आता काळजी करु नका.
कारण फेसबुक लहान मुलांसाठी एक विशेष चॅट अॅप आणत आहे. या चॅट अॅपचा कंट्रोल पालकांकडे असणार आहे.
पॅरेंटल कंट्रोलचा पर्याय
१२ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना फेसबुकचा सहज, चांगला वापर करा यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. फेसबुक टीमने सोमवारी मॅसेंजर प्लस अॅपचे खास वर्जन लहान मुलांसाठी आणले आहे. या अॅपमध्ये पॅरेंटल कंट्रोलचा पर्याय असणार आहे.
त्यामूळे मुलाच्या फेसबुक हालचालींवर पालकांना लक्ष ठेवता येणार आहे.
मुलांला फेसबूकशी जोडणे
आता या अॅपला अमेरिकेच्या iOS यूजर्सकडे टेस्टिंग करण्यासाठी लॉन्च करण्यात आले आहे. सुरूवातीला व्हिडिओ चॅट आणि मॅसेजिंग अॅप म्हणून टेस्ट केले जाईल. १२ वर्षाखालील मूलेही आपल्या माणसांशी जोडलेले रहावेत यासाठी हे खास फेसबुक मॅसेंजर आणण्यात आल्याचे प्रोडक्ट मॅनेजर लॉरेन चेंग यांनी सांगितले.
कॉन्टॅक्ट लिस्ट कन्ट्रोल
हे अॅप ६ ते १२ वर्षाच्या मुलांसाठी असून यावर जाहिराती आणि आक्षेपार्ह गोष्टी नसतील. पालक मुलांच्या कॉंन्टॅक्ट लिस्टला कंट्रोल करु शकतील. एखाद्या व्यक्तीशी न बोलावे असे वाटल्यास परवानगी नाकारु शकतील.