यूट्यूबला टक्कर देणार फेसबूक वॉच!
यूट्यूबला टक्कर देण्यासाठी फेसबूकनं वॉच लॉन्च केलं आहे. फेसबूकचं वॉच प्रकाशक आणि रचनाकारांना मदत करणारं ठरणार आहे.
मुंबई : यूट्यूबला टक्कर देण्यासाठी फेसबूकनं वॉच लॉन्च केलं आहे. फेसबूकचं वॉच प्रकाशक आणि रचनाकारांना मदत करणारं ठरणार आहे. फेसबूकनं मागच्याच वर्षी व्हिडिओ टॅब लॉन्च केला होता. हा टॅब फेसबूकवर व्हिडिओ सर्च करायला मदत करतो.
फेसबूक वॉचबद्दल फेसबूकच्या डेनियल डैनकर यांनी माहिती दिली आहे. आता तुम्हाला तुमचा आवडता शो पाहणं आणखी सोपं झालं आहे. आम्ही फेसबूकवर शो पाहण्यासाठी वॉच सुरू केलं आहे, असं डेनियल डैनकर ब्लॉग पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
फेसबूक वॉचवर अनेक शो प्रसारित होणार आहेत. याचबरोबर लाईव्ह आणि रेकॉर्ड केलेले व्हिडिओही प्रसारित करता येणार आहेत. वॉचबरोबरच फेसबूककडून वॉच लिस्टही तयार करण्यात येणार आहे. यूजर्स वॉचलिस्टमध्ये त्यांचा शो अॅड करू शकतात. नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम व्हिडिओसारखंच फेसबूकचं वॉच असणार आहे.
फेसबूकनं या शोंना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वाटलं आहे. मोस्ट टॉक्ट अबाऊट, व्हॉट्स मेकिंग पीपल लाफ अशा या कॅटेगरींची नावं आहेत. नैस डेली, गॅब्बी बर्नस्टीन आणि किचन लिटील हे काही शो सध्या फेसबूक वॉचवर उपलब्ध आहेत.