फेसबूकप्रमाणे आता हे फिचर ट्विटरवरही येणार....ट्विटला देता येणार असाही प्रतिसाद?
ट्विटरसुद्धा (Twitter) आता फेसबूकच्याच (Facebook) पावलावर पाऊल टाकतेय का, असं दिसतंय. कारण फेसबूकचे काही फिचर्स आता ट्विटरवरही तुम्हाला पाहायला मिळू शकतात.
मुंबई : ट्विटरसुद्धा (Twitter) आता फेसबूकच्याच (Facebook) पावलावर पाऊल टाकतेय का, असं दिसतंय. कारण फेसबूकचे काही फिचर्स आता ट्विटरवरही तुम्हाला पाहायला मिळू शकतात.
फेसबूकवर जसे तुम्ही एखाद्या इमोजीने रिअॅक्ट होऊ शकता, तसेच आता ट्विटरवरही करता येऊ शकणार आहे. सध्या या फिचरबाबत ट्विटर टेस्टिंग करत आहे. त्यामुळे इतक्यात तरी हे फिचर आपल्याला ट्विटरवर दिसणार नाही.
टेक क्रंचच्या एका रिपोर्टनुसार गेल्या महिन्यापासूनच ट्विटरने इमोजी आणण्याची कल्पना सुचविली होती. याबाबत एक सर्वेक्षणही सुरू आहे. ज्यामधून कळेल, की लोकांना ट्विटवर व्यक्त होताना इमोजी वापरायला आवडतील, की नाही?
सध्या ट्विटरवर तुम्हाला एखादे ट्विट आवडले, तर त्यावर केवळ लाईक करण्याचा पर्याय आहे, आणि त्याचाच इमोजी तुम्हाला दिसतो. इतररित्या व्यक्त होण्यासाठी ट्विटरवर कोणतेही इमोजी नाहीत.
मात्र फेसबूकवरील एखादी पोस्ट तुम्हाला आवडली, नाही आवडली, संतापजनक वाटली, हास्यास्पद वाटली, तर तुमच्या याच भावना व्यक्त करायला तशाप्रकारचे इमोजी फेसबूकवर आहेत. त्यामुळे एखाद्या पोस्टला नेमका कसा प्रतिसाद मिळतोय, हे फेसबूकवर जास्त स्पष्टपणे समजते.
म्हणूनच कदाचित ट्विटरही हा पर्याय आणण्याच्या विचारात आहे. याशिवाय एखादे ट्विट तुम्ही केलेत, तर ते एडीट करण्याचा पर्याय अजूनही ट्विटरवर उपलब्ध नाही. या पर्यायाबाबत नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणीही होत आहे. मात्र अद्याप ट्विटरने त्यावर कोणते पाऊल उचललेले नाही.