सॅन फ्रान्सिस्को : फेसबुकनं आपलं न्यूज फीड अपडेट केलंय. यामुळे आता फेसबुक युझर्सना स्थानिक बातम्या जास्तीत जास्त पाहायला मिळणार आहेत.


न्यूज फीड अपडेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुकच्या या अपडेटमुळे स्थानिक बातम्यांना प्राथमिकता मिळणार आहे. यामुळे युझर्सना आपल्या आजुबाजुला सुरु असलेल्या बातम्यांची जास्तीत जास्त माहिती मिळेल. 


स्थानिक बातम्या


फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही अपडेटची एक साखळी तयार केलयच... त्यामुळे अधिक उच्च गुणवत्ता आणि अधिक विश्वासार्ह बातम्या दिसू शकतील. गेल्या वेळी आम्ही केलेल्या अपडेटमुळे आपल्या फ्रेडलिस्टमधल्या सर्वात जास्त विश्वासार्ह बातम्या युझर्सना दिसत होता. आज आम्ही जे अपडेट केलंय त्यामुळे 'स्थानिक बातम्या' अधिक असतील. 


अमेरिकेत बदल लागू


हा बदल सर्वप्रथम अमेरिकेत लागू करण्यात आलाय. या वर्षीच्या शेवटापर्यंत जगभर हा बदल लागू करण्याचा फेसबुकचा मानस आहे. 


स्थानिक किंवा राष्ट्रीय स्रोतपैंकी युझर्स कोणत्या बातम्या अधिक पाहू इच्छितात, हा पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध असेल. यासाठी जास्तीत जास्त स्थानिक प्रकाशकांना यामध्ये सहभागी करून घेतलं जाईल. तसंच खेळ, कला आणि मानव हिताच्या स्टोरी प्रकाशित करणाऱ्यांना प्राथमिकता दिली जाईल. 


उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी फेसबुक आपल्या न्यूज फीडला खाजगी आणि व्यावसायिक अशा दोन भागांत विभाजित करण्यासाठी टेस्टिंग करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर मात्र फेसबुकचे शेअर्स दणदणीत आदळले होते.