नवी दिल्ली : फेसबुक आपल्या युजर्ससाठी आणखीन दोन नवे फिचर्स सादर करण्याच्या तयारीत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार, फेसबुक लवकरच दोन नव्या फिचर्सवर काम सुरु करु शकतं. यामध्ये 'रेड एन्व्हलप' आणि 'ब्रेकिंग न्यूज' या फिचर्सचा समावेश आहे. 


पैसे पाठवण्यासाठी होणार उपयोग


ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी फेसबुकच्या 'रेड एन्व्हलप' या फिचरचा फायदा होणार आहे. तर 'ब्रेकिंग न्यूज' या फिचर्सच्या माध्यमातून ताज्या घडामोडी यूजर्सना सहज कळणार आहेत. मात्र, नव्याने येणाऱ्या या दोन्ही फिचर्सची अद्याप अधिकृत चाचणी झालेली नाहीये.


नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहार, कॅशलेस व्यवहार करण्याचे आवाहन केंद्र सरकारने केलं. त्यानंतर डिजिटल व्यवहारांत वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे आता येत्या काळात फेसबुकच्या 'रेड एन्व्हलप' या फिचरचा युजर्सला मोठा फायदा होणार आहे. 


फेसबुक नेहमीच नव्या गोष्टींचं परिक्षण करत असतं. मात्र, सध्या बोलण्यासारखं असं काहीही नाहीये असं फेसबुकच्या प्रतिनिधीकडून माहिती समोर आली आहे. रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की, हे दोन्ही फिचर्स भविष्यात लॉन्च केले जाऊ शकतात आणि हे लॉन्चिंग रद्दही केलं जाऊ शकतं.


या वर्षाच्या सुरुवातीला फेसबुकने आपल्या मॅसेंचर अॅपमध्ये ग्रुप पेमेंट सुविधा लॉन्च केली होती. त्यामुळे एका ग्रुपमधील सर्व सदस्यांमध्ये पैशांचे व्यवहार करु शकतात.