नवी दिल्ली : फेसबुक (Facebook) आता काही यूजर्सला व्हॉईस रेकॉर्डिंगसाठी पैसे देणार आहे. सोशल मीडिया फेसबुक, याद्वारे व्हॉईस रेक्गनाइयजेशन टेक्नोलॉजीमध्ये काही सुधारणा करु इच्छित असल्याचं म्हटलं जातंय. कंपनीने स्वत: याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी मिळालेल्या माहितीनुसार, अमेझॉन, ऍपल, गूगल आणि मायक्रोसॉफ्टनेही यूजर्सचं व्हॉईस रेकॉर्डिंग त्यांच्या परवानगीशिवाय रेकॉर्ड केलं होतं. परंतु त्यानंतर कंपनीने आपली बाजू मांडताना सांगितलं की, या रेकॉर्डिंगमागे त्यांचा उद्देश केवळ व्हॉईस रिक्गनायजेशन योग्य करणं हा होता. याआधी फेसबुकला डेटा चोरीबाबत टीकेचा सामनाही करावा लागला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द वर्ज'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, फेसबुकने त्यांच्या या व्हॉईस रेकॉर्डिंगसाठीच्या प्रोजेक्टचं नाव 'Pronunciations' ठेवलं आहे. हा कंपनीचा एक नवीन प्रोग्राम आहे. ज्याद्वारे आपण आपल्या व्हॉइस रेकॉर्डिंगद्वारे पैसे कमवू शकतो. यूजर या प्रोग्रामसाठी पात्र ठरल्यास त्या यूजरला रेकॉर्डिंगसाठी पैसे मिळणार आहेत.


व्हॉईस रेकॉर्ड करण्यासाठी सर्वात आधी 'Hey portal'त्यानंतर तुमच्या फेसबुक फ्रेंडलिस्टमधील पहिल्या फ्रेंडचं नाव सांगाव लागेल. यात १० मित्रांची नाव घेता येऊ शकतात. आणि प्रत्येक वाक्य दोन वेळा रेकॉर्ड करावं लागेल. 


मात्र, फेसबुक यासाठी अधिक पैसे देणार नाही. जर यूजरने एक सेटचं रेकॉर्डिंग पूर्ण केल्यास फेसबुकच्या व्ह्यूपॉईंट्स  (Viewpoints) या ऍपमध्ये २०० पॉईंट्स मिळतील. पण जोपर्यंत यूजरचे १००० पॉईंट्स होत नाहीत, तोपर्यंत यूजर व्ह्यूपॉईंट्समधून पैसे काढू शकत नाही. 


हा प्रोनाउनसिएशन प्रोग्राम केवळ अमेरिकन यूजर्ससाठी आहे. या प्रोग्राममध्ये भाग घेण्यासाठी यूजरचं वय १८ वर्षाहून अधिक असणं गरजेचं आहे. त्याशिवाय यूजरचे ७५हून अधिक फेसबुक फ्रेंड्स असणं गरजेचं आहे. भारतातही या प्रोग्रामची लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. परंतु याबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.