नवी दिल्ली : एका व्हायरल Whatsapp मॅसेजमधून करण्यात आलेल्या दाव्यानुसार भारत सरकारकडून बुधवारी रात्री हे अॅप सस्पेंड करण्याचे आदेश दिले आहेत. या मॅसेजनुसार सरकारकडून या इंन्स्टंट मॅसेजिंग अॅपवर रात्री 11.30 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत प्रतिबंध लावण्यात येणार आहे. हा मॅसेज फॉरवरर्ड करण्यात आला नाही तर युजर अकाऊंट डिलीट करण्य़ात येईल असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकंच नव्हे तर, अकाऊंट अॅक्टिव्ह करण्यासाठी युजरना प्रति महिना काही रक्कमही मोजावी लागणार असल्याचं या मॅसेजमध्ये म्हटलं गेलं आहे. मॅसेजमध्ये इथवरच न थांबता तो फॉरवर्ड करणाऱ्या युजरला एक नवं आणि सुरक्षित व्हॉट्स अॅप अकाऊंट देण्यात येईल असंही सांगण्यात आलं होतं. 


अतिशय मोठ्या प्रमाणात गोंधळाचं वातावरण निर्माण करणाऱ्या या मॅसेजबाबत अखेर प्रेस इंडिया ब्यूरो (PIB) कडून काही गोष्टी स्पष्ट करण्य़ात आल्या आहेत. हा मॅसेज पूर्णपणे चुकीचा असून, अशा फॉरवर्डेड मॅसेजच्या आहारी न जाण्याचं आवाहन पीआयबीकडून करण्यात आलं आहे. 




फसवे आणि दिशाभूल करणारे असे मॅसेज आल्यास त्यातील कोणत्याही लिंकवर क्लिक करु नये असं सांगत युजर्सना पीआयबीकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तुम्हालाही असा कोणता मॅसेज आल्यास, त्यामधील कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका नाहीतर पडेल महागात....