विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद  :  एटीएम पिनची चोरी रोखणारं बटण एटीएमवरच असल्याचा दावा करण्यात आलाय. ते बटण पैसे काढण्यापूर्वी दोन वेळा दाबलं तर पिनची चोरी होत नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल केली. मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात. (fact check viral polkhol know atm pin theft prevention button know what tuth and what fake) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दावा आहे की, एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी एटीएमवरील कॅन्सल बटण दोन वेळा दाबल्याने पिनची चोरी होणार नाही. रिझर्व्ह बँकेनंच असं पत्रक काढल्याचा दावा करण्यात आलाय. हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेकांना एटीएम सुरक्षेबाबत विश्वास निर्माण झालाय. पण, खरंच एटीएमवरील कॅन्सल बटण पिनची चोरी रोखतं का, याची आम्ही पडताळणी सुरू केली. 


हा विषय प्रत्येकाच्या गरजेचा आहे. त्यामुळं आमचे प्रतिनिधी विशाल करोळे एटीएममध्ये पोहोचले. आणि त्यांनी पैसे काढण्यापूर्वी दोन वेळा कॅन्सल बटण दाबून काही फरक पडतो का याबद्दल जाणून घेतलं.


एटीएममध्ये तसं कोणताही फरक पडताना दिसत नाही. आम्ही आरबीआयला संपर्क केला. त्यावेळी त्यांनी असा कोणताही दावा केला नसल्याचं त्यांनी म्हटलं. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहुयात.


व्हायरल पोलखोल


पैसे काढण्यापूर्वी कॅन्सल बटण दाबल्याने पिन चोरी होत नाही हे खोटं. आरबीआयने असा कोणताही दावा केलेला नाही. एटीएममधून पैसे काढताना कुणालाही पिन नंबर सांगू नका. 


असे खोटे दावे करून लोकांची दिशाभूल केली जाते. त्यामुळे अशा दाव्यांवर विश्वास ठेवण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आमच्या पडताळणीत एटीएममधून पैसे काढण्याआधी दोन वेळा कॅन्सल बटण दाबल्याने पिन चोरी होत नसल्याचा दावा असत्य ठरला.