अमर काणे, झी मीडिया, नागपूर : तुम्ही जर सतत टीव्ही पाहत असाल तर ही बातमी पाहा. एका संस्थेनं जो दावा केलाय तो दावा ऐकून तुम्ही टीव्ही पाहणं सोडून द्याल. अधिकवेळ टीव्ही पाहिल्याने हार्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढून मृत्यू होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल केली, मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात. (fact check viral polkhol risk of heart attack while watching tv know what truth)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दावा आहे की सतत टीव्ही पाहिल्याने स्ट्रोक, हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू होण्याचा धोका अधिक आहे. तब्येतीसाठी टीव्ही चांगला नसून, जास्त वेळ पाहू नये असा दावा ब्रिटनच्या बॉयो बँक या संस्थेनं केलाय. 


अनेक जणांना अधिकवेळ टीव्ही पाहण्याची सवय आहे. त्यामुळे या दाव्याची पोलखोल करणं गरजेचं आहे. खरंच सतत टीव्ही पाहिल्याने हार्ट अॅटकने मृत्यूचा धोका होतो का याची आम्ही पडताळणी करण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर काणे एक्सपर्टला भेटले. त्यांना मेसेज दाखवला आणि याबाबत अधिक माहिती जाणून घेतली. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय पोलखोल झाली पाहुयात. 


व्हायरल पोलखोल


टीव्हीमुळे हार्ट अॅटॅकने मृत्यूचा धोका वाढतो हे खोटं आहे. टीव्हीसमोर अधिकवेळ बसल्याने अनेक प्रॉब्लेम जाणवतात.  लठ्ठपणा, डायबिटीस, हृदयाच्या समस्या वाढतात. जास्तवेळ एकाच ठिकाणी बसू नये, थोडं चालायलाही हवं.


टीव्ही पाहिल्याने थेट हृदयावर परिणाम होत नाही. त्यामुळे लागणाऱ्या सवयीमुळे हृदयाच्या समस्या वाढतात. आमच्या पडताळणीत अधिकवेळ टीव्ही पाहिल्याने हार्टने मृत्यूचा धोका वाढतो हा दावा असत्य ठरला.