New car launch :   महागाईने सगळ्यांचं कंबरडं मोडला असताना जर तुमच्याकडे  चरचाकी वाहन  असले तर पेट्रोलच्या वाढत्या किमती तुमच्या त्रासात भर टाकण्याचं काम करतात,.
दिवसेंदिवस महागाई झपाट्याने वाढत चाललेय ,दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्ट हि प्रचंड महाग होत चाललेय त्यामुळे जगायचं कास असा प्रश्न सर्वसामान्याना भेडसावत असतो .अशात जर तुमच्याकडे चारचाकी असेल तर पेट्रोल च्या वाढत्या किमतीमुळे चारचाकी चालवणं सुद्धा जीवावर येऊ लागत.आणि जर नवीन गाडी घ्यायचा विचार केला तर पेट्रोलचे वाढते भाव पाहता नवी गाडी घेणं नकोस वाटू लागत मात्र आता यावर एक पर्याय शोधला गेलाय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 जर्मन स्टार्ट-अप सोनो मोटर्सने अलीकडेच त्यांच्या सौर उर्जेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन 'द सायन' ची अंतिम सिरीज सादर केली.  कंपनीची 2.5 लाख वाहने बनवण्याची योजना आहे.
 
 कंपनीला द सायनसाठी आधीच 19,000 प्री-बुकिंग झाल्या आहेत. या गाडीची किंमत सुमारे $25,000 (रु. 19,94,287) असण्याची शक्यता आहे.



 सोलर पॅनलच्या मदतीने या वाहनाची ग्रेड आणखी वाढवता येऊ शकते, परंतु यामुळे त्याची किंमत खूप वाढेल. सध्या सोनो मोटर्स या वाहनाची किंमत सुमारे 19,94,287 रु.  ठेवण्यावर काम करत आहे.  जर सर्व काही ठीक झाले तर हे वाहन टेस्ला आणि फोक्सवॅगनच्या इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा खूपच स्वस्त असेल


 हे 456 सोलर पॅनेलसह पाच दरवाजांचे इलेक्ट्रिक वाहन आहे. यामुळे ही कार एका आठवड्यात सुमारे 112 किमी अधिक धावू शकते.  याशिवाय, या वाहनातील बॅटरी एका चार्जवर सुमारे 300 किमीची रेंज देऊ शकते.