मुंबई : बिग शॉपिंग डे सेलला मिळालेल्या प्रतिसादानंतर ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट आता तीन दिवसांचा न्यू पिंच डे सेल घेऊन आलं आहे. १५ डिसेंबर ते १७ डिसेंबरपर्यंत हा सेल सुरु राहणार आहे. या सेलमध्ये लेनोव्हो K8 प्लस, गॅलेक्सी ऑन5, गॅलेक्सी J3प्रो आणि इतर गॅलेक्सी मोबाईल्सवर भरघोस डिस्काऊंट देण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोबाईल्सबरोबरच इलेक्ट्रॉनिक्स, किचनमधल्या वस्तू, फर्निचर, फॅशन या वस्तूंवरही डिस्काऊंट मिळणार आहे. तसंच या वस्तूंवरच्या EMIवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही.


या मोबाईल्सवर मिळणार डिस्काऊंट


गॅलेक्सी J3प्रो, 2GB


८,४९० रुपयांना असणारा हा स्मार्टफोन ६,९९० रुपयांना मिळणार आहे. Sबाईक मोड असलेला हा स्मार्टफोन मागच्यावर्षी एप्रिलमध्ये लॉन्च झाला होता. 5 इंचाचा एचडी डिस्प्ले असलेल्या या फोनमध्ये 1.2 GHz चा क्वाडकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 410 प्रोसेसर आहे.


गॅलेक्सी ऑन 5


सॅमसंग गॅलेक्सी सीरिजमधला हा स्मार्टफोन ६,४९० रुपयांना मिळणार आहे. २०१५मध्ये हा स्मार्टफोन लॉन्च झाला होता. या फोनमध्ये 1.5GB रॅम, 1.3GHz क्वाडकोर एक्सीनोस 3475 प्रोसेसर आणि 2600mAh बॅटरी आहे.


गॅलेक्सी ऑन मॅक्स


4GB रॅम असलेला हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर १४,९०० रुपयांना मिळणार आहे. या फोनची बाजारातली किंमत १६,९०० रुपये एवढी आहे. जुलै २०१७मध्ये लॉन्च झालेल्या या फोनमध्ये 1.69GHz चा ऑक्टाकोर मीडियाटेक MTK P25 प्रोसेसर आहे.


लेनोव्हो K8 प्लस


लेनोव्होचा हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर ८,९९९ रुपयांना मिळणार आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये लॉन्च झालेल्या या फोनची बाजारातली किंमत १०,९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनला 5.2 इंचाचा डिस्प्ले, 2.5 GHz ऑक्टाकोर मीडियाटेक हेलियो P25 प्रोसेसर, 3GB रॅम, 32 GB इंटरनल स्टोरेज आणि 4000mAh आहे.