मुंबई : कोरोना काळात बहुसंख्य लोक ऑनलाईन शॉपिंग करतात. अशात फ्लिपकार्टने सेलची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टने Flipkart Big Saving Days Sale ग्राहकांसाठी आयोजित केलं आहे. टीव्ही, लॅपटॉप आणि इतर वस्तूंवर सूट असणार आहे. पण ही सवलत ठरावीक दिवसांसाठी असणार आहे. फ्लिपकार्ट सेल 2 मे ते 7 मे पर्यंत असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 Apple, Vivo, Asus आणि  Xiaomi या स्मार्टफोनवर सूट असणार आहे. तर याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स आणि एक्सेसरीजवर 80 टक्के सुट मिळणार आहे. त्याचप्रमाणे कपडे, किराणा, फर्नीचरवर देखील ऑफर असणार आहे.  


जाणून घ्या काय असतील ऑफर्स
- Apple iPhone 11जो सध्या 54 हजार 900 रूपयांमध्ये मिळत आहे. फ्लिपकार्टवर 44 हजार 999 रूपयांमध्ये तुम्हाला घेता येणार आहे.


-  55 हजार 999 रूपयांचा असूस आरओजी स्मार्टफोन 46 हजार 999 रूपयांमध्ये उपलब्ध आहे. 


- 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजचा iQOO 3 स्मार्टफोन 24 हजार 990 रुपये किंमतीत घेता येणार आहे. 


 - सेल दरम्यान अधिक सूट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सॅमसंग गॅलेक्सी F12 9 हजार 999 रुपये किंमतीत तुम्हाला विकत घेता येणार आहे. 


- एचडीएफसी बँक कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर 10 टक्के त्वरित सूट देईल. फ्लिपकार्ट स्मार्टफोन एक्सचेंजवर 1000 रुपयांची किमान गारंटी देखील असेल.