मुंबई :  फ्लिपकार्ट (Flipkart) या ऑनलाईन ई कॉमर्स वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंवर डिस्काउंट दिलं जातं. सध्या फिल्पकार्टवर रियलमी डेज सेल (Flipkart Realme Days) सुरु आहे. हा सेल 24 नोव्हेंबरपर्यंत सुरु असणार आहे. या सेलमध्ये रियमलीच्या स्मार्टफोन्सवर धमाकेदार डिस्काउंट मिळणार आहे. महागतले महाग स्मार्टफोन्स कमी किंमतीत मिळतील. रियलमी 9 ( Realme 9) तुम्ही 1 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करु शकता. या मोबाईलची किंमत 21 हजार रुपये आहे. मात्र सेलमध्ये या स्मार्टफोनवर डिस्काउंट आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 999 रुपयात खरेदी करु शकता. नक्की 999 रुपयात हा स्मार्टफोन कसा मिळवायचा हे आपण जाणून घेणार आहोत. (flipkart realme days get realme 9 smartphone 999 ruppes know details)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सेलनिमित्ताने रियलमी 9 ची किंमत फार कमी करण्यात आली आहे. रियलमी 9 ची लॉन्चिंग प्राइज ही 20 हजार 999 रुपये इतकी आहे. मात्र सेलमध्ये हा स्मार्टफोन 16 हजार 999 रुपयात उपलब्ध आहे. म्हणजेच स्मार्टफोनवर 4 हजार रुपयांचं डिस्काउंट आहे. फोनवर एक्सचेंज ऑफरही आहे. ज्यामुळे स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होईल. 


रियलमी 9 वर 16 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जुना मोबाईल एक्सचेंज केला तर इतकी ऑफर मिळू शकते. मात्र 16 हजार रुपयांच्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी मोबाईल चांगल्या कंडीशनमध्ये असायला हवा. तसेच मॉडेल लेटेस्ट असायला हवं. जर तुम्हाला पूर्ण ऑफ मिळाला तर मोबाईल 999 रुपयात मिळालाच समजा. 


जर जुना स्मार्टफोन एक्सचेंज न करणाऱ्यांसाठीही एक ऑफर आहे. फिल्पकार्ट एक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 850 रुपयांचं कॅशबॅक मिळेल. त्यामुळे मोबाईलची किंमत 16 हजार 149 रुपये इतकी होईल.