Flipkart Big Billion Days Sale :  ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर ग्राहकांसाठी नवनवीन सेलचे सातत्याने आयोजन केले जात असते. तुम्ही जर या आधीच्या सेलचा फायदा घेतला नसल्यास काळजी करण्याचे कारण नाही. कारण फ्लिपकार्टने त्याच्या आगामी सेलची घोषणा केली आहे. हा सामान्य सेल नसून फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल आहे. या सेलमध्ये तुम्हाला विविध स्मार्टफोन्सवर आकर्षक सूट मिळणार असून ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवर 80 टक्के सूट मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गृहोपयोगी वस्तूंवर बंपर डिस्काउंट


तुम्ही नवीन टीव्ही किंवा इतर कोणतेही गृह उपकरण खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुम्ही फ्लिपकार्ट सेलचा लाभ घेऊ शकता. टीव्ही आणि गृहोपयोगी वस्तूंवरही 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. यामध्ये तुम्हाला 199 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत गिझर आणि इतर वस्तू मिळतील.


त्याचसोबत एअर कंडिशनरवर 55% पर्यंत सूट असेल. टॉप ब्रँडचे टीव्ही 8,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असतील. विक्रीमध्ये फॅशन उत्पादनांवर 60% पर्यंत सूट देखी असणार आहे. ग्राहकांना दररोज काही खास डील्स मिळतील ज्याचा फायदा घेऊन तुम्ही अनेक वस्तू स्वस्तात खरेदी करू शकता.


दररोज मिळणार खास डील्स 


सेल वर दररोज रात्री 12 वाजेपासून ते सकाळी 8  आणि संध्याकाळी 4 वाजेपर्यंत क्रेझी डील्स उपलब्ध असतील. Filpkart big billion days sale कधी सुरू होईल याची अद्याप माहिती मिळाली नाही. कंपनी लवकरच विक्रीची तारीख जाहीर करू शकते. फ्लिपकार्टची ही विक्री नवरात्रीपूर्वी होईल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला फ्लिपकार्ट सेलमध्ये बँक डिस्काउंटचाही लाभ मिळेल.


येथे तुम्ही ICICI बँक आणि Axis बँक कार्डवर अतिरिक्त 10% सूट देखील मिळवू शकता. सेलमधील स्मार्टफोन्सवरील ऑफर उघड करण्यात आलेल्या नाहीत. दुसरीकडे, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवरील अनेक आकर्षक डील नक्कीच मिळतील.


येथून तुम्ही 75% सूट देऊन ट्रिमर खरेदी करू शकता. गेमिंग लॅपटॉपवर 40% पर्यंत सूट. तुम्ही प्रिंटर, मॉनिटर्स आणि इतर वस्तू 80% पर्यंत सवलत देऊन खरेदी करण्यास सक्षम असाल.