Flipkart वर घसघशीत Offer! केवळ 549 रुपयांमध्ये मिळतोय हा स्मार्टफोन, पाहा Sales Details
Flipkart Sales : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही Flipkart वर सध्या सुरु असलेल्या सेलचा फायदा घेऊ शकता. नेमकी ऑफर्स काय आहे याबद्दल सविस्तर जाणून घ्या...
Flipkart Sales Offers : शॉपिंग किंवा एखादी वस्तू खरेदी करायचं म्हटलं की अनेकजण ऑपलाईन पेक्षा ऑनलाईनला पसंती देतात. त्यामुळे ऑनलाइन वस्तू खरेदी करण्याची क्रेझ वाढली आहे. त्यातच ऑनलाईन खरेदी करताना कोणती ऑफर्स मिळते का? यासाठी अनेकजणांचा ऑनलाईन शॉपिंगकडे कल वाढत चालला आहे. यामध्ये Flipkart आणि amazon अशा कंपन्या नेहमीच ऑफर्स देत असतात. आजही Flipkart वर घसघशीत Offer देण्यात आली असून केवळ 549 रुपयांमध्ये स्मार्टफोन मिळत आहे.
जर तुम्हाला स्वस्तात मस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही flipkart वर भेट देऊ शकतात. कारण यावर MOTOROLA G13 हा फोन केवळ 549 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. कारण Flipkart तुम्हाला अशी ऑफर देत आहे, ज्या अंतर्गत MOTOROLA G13 स्वस्तात खरेदी करता येईल. या फोनवर 9,450 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. या ऑफरमुळे फोन अगदी कमी किमतीत विकत घेता येईल.
वाचा: 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, पाहा कुठे, कधी?
फोनसोबत फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड ऑफरही दिली जात आहे. यासोबत तुम्हाला 5 टक्के कॅशबॅक दिला जाईल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते EMI वर खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला दरमहा 352 रुपये द्यावे लागतील. या फोनसोबत तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला 9,450 रुपयांपर्यंतची ऑफर मिळू शकते. जर तुम्ही पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळवण्यात व्यवस्थापित केले, तर तुम्हाला हा फोन फक्त 549 रुपया मध्ये मिळेल.
फोनमध्ये 6.5 इंच एचडी प्लस डिस्प्ले आहे. यात 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचा पहिला सेन्सर 50 मेगापिक्सेलचा आहे. दुसरा 2 मेगापिक्सेलचा आणि तिसरा 2 मेगापिक्सेलचा आहे. फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर आहे. यासोबतच 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन Helio G85 प्रोसेसरने सुसज्ज आहे.