CRPF Recruitment: 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, पाहा कुठे, कधी?

CRPF Recruitment 2023 : कोरोना आणि लॉकडाऊन यांसारखं चित्र पाहायलानंतर अनेकांना नोकरीची चिंका सतावत असते. अशातच नुकतीच दहावी आणि बारावीची परीक्षा संपल्यानंतर काही विद्यार्थी नोकरीच्या शोधात बाहेर पडतात. अशा 10 वी आणि 12वीच्या उत्तीर्णं विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. पाहा सविस्तर बातमी... 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 6, 2023, 02:45 PM IST
CRPF Recruitment: 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, पाहा कुठे, कधी? title=
CRPF Constable Recruitment 2023

CRPF Recruitment 2023 :  नुकतीच दहावी आणि बारावीची परीक्षा संपली आहे. तुम्ही जर दहावी, बारावी पास असाल तर तुमच्यासाठी नोकरीची (CRPF Recruitment 2023) सुवर्णसंधी चालून आली आहे.  केंद्रीय गृह मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) 1.30 लाख कॉन्स्टेबल भरती करणार आहेत. अधिसूचनेनुसार या भरतीमध्ये एकूण 1,29,929 पदे असतील आणि या भरतीमध्ये पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र पदे राखीव ठेवण्यात आली आहेत.

अशा परिस्थितीत ज्यांना या भरतीसाठी अर्ज करायचा असेल त्यांनी CRPF crpf.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.  या वेबसाईटवर सर्व माहिती दिली असून त्यात अर्ज कसा करायचा हे त्यांना येथून कळू शकणार आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, CRPF मध्ये कॉन्स्टेबलच्या भरतीसाठी एकूण 129929 पदे भरली जातील. अशा परिस्थितीत या पदांपैकी 125262 पुरुष उमेदवारांची भरती केली जाणार आहे. तर 4667 पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. 

वाचा: तुमचे कर्ज महाग होणार की स्वस्त? आरबीआयची मोठी घोषणा

या भरतीमध्ये निवडल्या जाणाऱ्या तरुणांना 21,700 रुपये ते 69,100 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. ही भरती फक्त कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) साठी असेल आणि त्यात फक्त भारतीय नागरिकांनाच भरती करता येईल. या भरतीमध्ये नेपाळ आणि भूतानच्या नागरिकांना प्राधान्य दिले जाणार नाही, असे अधिसूचनेत म्हटले आहे. अशा परिस्थितीत या भरतीसाठी ज्यांचे वय 18 ते 23 वर्षे आहे तेच उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट दिली जाईल. त्याचबरोबर ओबीसी प्रवर्गातील तरुणांना ही सूट तीन वर्षांसाठी असेल.

10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी संधी

या भरतीसाठी अर्ज करण्‍यासाठी तुमच्‍याकडे कोणत्याही बोर्डातून 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य शिक्षण असणे आवश्‍यक आहे. अशा परिस्थितीत या भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांना कार्यक्षमता चाचणी आणि लेखी चाचणी या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागेल. जर एखाद्या माजी अग्निवीरने देखील या भरतीसाठी अर्ज केला तर त्याला शारीरिक कार्यक्षमता चाचणी द्यावी लागेल. याआधी सरकारने येत्या काही दिवसांत रिक्त पदांवर नियुक्त्या करणार असल्याचे जाहीर केले आहे. या घोषणेनुसार ही भरती करण्यात आली आहे.