मुंबई : जर तुम्ही नवीन फोन घेण्याच्या विचारात असाल. तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची असू शकते. फ्लिपकार्टवर सुपर व्हॅल्यू वीकची सुरूवात झाली आहे. ही ऑफर  १८ जूनपासून सुरू झाली आहे. २४ जून रोजी या ऑफरचा शेवटचा दिवस असणार आहे. या दरम्यान ग्राहक आठवडाभर स्मार्टफोन्सच्या अनेक ऑफर्सचा फायदा घेऊ शकणार आहेत. या सेलमध्ये सर्वात खास ऑफर गूगल पिक्सल २ च्या १२८ जीबी वेरिएंटवर दिला जाणार आहे. ७० हजार किंमत असणारा, हा स्मार्टफोनवर ग्राहकांना १० हजार ९९९ रूपयात सुरूवातीला हातात येऊ शकतो.


फक्त गुगल पिक्सलंच नाही, तर Moto X4 (4GB) ला देखील, २२ हजार ९९९ रूपयात नाही, तर ७ हजार रूपयात तुम्ही खरेदी करू शकतात. मात्र खरेदी करताना कंपनीने काही अटी घातल्या आहेत, त्या तुम्ही तुमच्या जबाबदारीवर व्यवस्थित, नीट वाचून, समजून घ्या, त्यानंतरच फोन खरेदी करा. कारण अनेक ऑफर्स फक्त दाखवण्यासाठी असल्याचं दिसून येतं. त्यामुळे सर्व अटी वाचूनच खरेदी करा.