मुंबई : सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म Flipkart वर सेल सुरू आहे. Flipkart Smartphone Carnival असा हा सेल आहे, यामध्ये अनेक स्मार्टफोनवरती डिस्काउंट दिले जात आहे. या सेलमध्ये आयफोन 12 सीरीजवर प्रचंड सूट देण्यात येत आहे. आयफोन 12 सुमारे 13 हजार रुपयांच्या सूटसह उपलब्ध आहे. हा सेल 8 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयफोन 12 च्या 64 जीबी व्हेरिएंटवर 12 हजार 901 फ्लॅट डिस्काउंट उपलब्ध आहे. Flipkartच्या फ्लॅट डिस्काउंटनंतर आयफोन 12  तुम्हाला 66 हजार 999 रुपयात मिळेल. यासाठी दरमहा 2 हजार 290 रुपयांपासून ईएमआयचा पर्याय देखील उपलब्ध आहेत.


या व्यतिरिक्त, आयफोन 12 15 हजार रुपयांच्या एक्सचेंज ऑफरसह उपलब्ध आहे. ज्यामुळे हँडसेटची किंमत आणखी कमी होऊ शकते.


आयफोन 12 च्या जवळपास सर्व स्टोरेज ट्रिमवर 12 हजार 901 रुपयांची फ्लॅट सवलत लागू आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही 128GB iPhone 12 71 हजार 999 रुपयांना खरेदी करू शकता, त्याची मुळ किंमत 84 हजार 900 रुपये आहे.


आयफोन 12 चे 256GB वेरिएंट 81 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, जे त्याच्या 94 हजार 900 रुपयांच्या लॉन्च किमतीपेक्षा कमी आहे.


फ्लिपकार्ट स्मार्टफोन कार्निवल सेल आयफोन 12 मिनीवर देखील सूट देत आहे. ते 59 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, जे त्याच्या 69 हजार 900 रुपयांच्या लॉन्च किंमतीपेक्षा कमी आहे.


आयफोन 11 हे 51 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे, हे त्याच्या मुळ किंमतीपेक्षा कमी आहे. याशिवाय, iPhone XR फ्लिपकार्ट स्मार्टफोन कार्निवल सेलचा एक भाग आहे आणि 64GB मॉडेल 42 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.