Netflix, Amazon Prime, Disney+Hotstar चे असे मिळवा मोफत सबस्क्रीप्शन ...
Free OTT Subscription: सध्या बरेच OTT प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, त्या सर्वांना एकावेळी सबस्क्राइब करणे खर्चिक असते. यापैकी नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईमचे मोफत सबस्क्रीप्शन मिळवण्यासाठी हा पर्याय उपलब्ध आहे.
Free OTT Subscription: भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म्स मनोरंजनाच्या बाबतीत वर्चस्व गाजवताना दिसत आहे. लॉकडाऊनच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी अधिकाअधिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यश मिळवले. हे ओटीटी माध्यमांच्या वाढत्या सबस्क्राईबर संख्येतून स्पष्ट होते. आज जेवढी लोकप्रियता सिनेमाची आहे. (free ott Subscription free netflix free amazon prime video free disney hotstar subscription plans)
तेवढीच किंवा जास्त लोकप्रियता ओटीटीचीही आहे. जर तुम्हाला OTT प्लॅटफॉर्म वापरायला आवडत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्हाला नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने + हॉटस्टार (Netflix, Amazon Prime, Disney+Hotstar) एक वर्ष मिळण्याची संधी आहे. तुम्ही सदस्यता शुल्क न भरता सदस्यत्व मिळवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक फॉर्म भरावा लागेल. याबद्दल सविस्तर बातमी जाणून घ्या...
हा फॉर्म मोफत ओटीटी सबस्क्रिप्शनसाठी भरावा लागेल
Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar या तीनही प्रमुख OTT प्लॅटफॉर्मवर दूरसंचार कंपनी जिओच्या पोस्टपेड (jiO postpaid) प्लॅनमध्ये एका वर्षासाठी फ्री मध्ये घेऊ शकता. तुम्हाला या OTT सबस्क्रिप्शनचा मिळावयचं असेल तर तुम्हाला Jio च्या पोस्टपेड प्लानसाठी अर्ज करावा लागेल आणि त्याचा फॉर्म भरावा लागेल. तीनही OTT अॅप्सची मेंबरशिप देणार्या एक हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेले कोणते प्लॅन आहेत हे जाणून घ्या.
ही सर्वात स्वस्त योजना
जिओच्या या प्लानची किंमत 399 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्यासाठी 75GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत. ही योजना Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar च्या एका वर्षाच्या मोफत सबस्क्रिप्शनसह येते.
599 रुपयांच्या प्लॅनचे फायदे
या प्लॅनमध्ये तुम्हाला 100GB इंटरनेट, 100 दैनिक एसएमएस आणि अमर्यादित व्हॉइस कॉलिंग मिळते. या प्लॅनमध्ये तुम्हाला Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar चे एक वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे.
पोस्टपेड प्लॅनची किंमत 799 रुपये आहे
799 रुपयांच्या प्लॅनमध्ये 150GB डेटा आणि 200GB रोलओव्हर डेटा दिला जात आहे. हा एक फॅमिली प्लॅन आहे ज्यामध्ये दोन अतिरिक्त सिम कार्ड, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि अमर्यादित एसएमएस दिले जात आहेत. या प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे.
ही योजना सर्वात महाग आहे
एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या OTT प्लॅनच्या यादीतील हा सर्वात महागडा प्लान आहे. ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध असलेल्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये २०० जीबी हायस्पीड डेटा, ५०० जीबी रोलओव्हर डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएस सुविधा आणि तीन सिम कार्ड दिले जात आहेत. हे प्लॅन Netflix, Amazon Prime Video आणि Disney + Hotstar च्या सदस्यत्वासह देखील येतात.