Credit Card Tips: गेल्या काही वर्षांपासून क्रेडिट कार्डचा वापर मोठ्याप्रमाणात वाढला आहे. अनेक बँकांकडून क्रेडिट कार्ड देण्यात येतात. तर, अनेक ठिकाणी क्रेडिट कार्डवर विविध ऑफर्स व डिस्काउंटदेखील मिळते. मात्र, क्रेडिट कार्ड घेताना इन्कम प्रुफ गरजेचे असते. पण तर इन्कम प्रुफ म्हणजेच उत्पन्नाचा दाखला नसेल तर मात्र क्रेडिट कार्ड घेताना अडचणी येतात. मात्र, या काही टिप्स वापरून तुम्ही इन्कम प्रुफ नसतानाही क्रेडिट कार्ड घेऊ शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा विद्यार्थ्यांना व व्यापाऱ्यांनादेखील क्रेडिट कार्डची गरज भासते. अशावेळी इन्कम प्रुफ नसल्यास केड्रिट कार्ड मिळणे अवघड होते. तुमच्याकडेही इन्कम प्रुफ नसताना क्रेडिट कार्ड मिळवायचे आहे तर या टिप्स फॉलोकरुन आरामात कार्ड मिळवू शकता. 


क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी काय कराल


बँकेचे खाते असणे गरजेचे 


Bank Bazaar वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुमचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे. बँक खाते हे कोणत्याची व्यक्तीची आर्थिकदृष्ट्या ओळख असते. तुम्ही कोणत्याही कंपनीचे क्रेडिट कार्ड घेण्यासाठी अर्ज करत असाल तर त्यात तुमच्या बँक खात्याची माहिती देणे गरजेचे आहे. 


पती किंवा पत्नीच्या इन्कमची माहिती द्या


तुमच्याकडे इन्कम प्रुफ नसेल आणि तरीही तुम्हाला क्रेडिट कार्ड पाहिजे असेल तर तुम्ही पती किंवा पत्नीचे इन्कम प्रुफची माहिती देऊन क्रेडिट कार्ड मिळवू शकता. ही टिप्स वापरून तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळण्याची शक्यता वाढते. 


एफडीवर मिळू शकते क्रेडिट कार्ड


अनेक बँका व अर्थ कंपन्या आरामात एफडीवर क्रेडिट कार्ड देऊ शकतात. अशा प्रकारच्या क्रेडिट कार्डना सिक्युअर क्रेडिट कार्ड म्हणतात. या कार्डची लिमिट साधारणातही एफडीच्या रकमेपेक्षा 75 ते 80 टक्क्यापर्यंत असू शकते. या प्रकारच्या क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या इन्कम प्रुफची गरज भासत नाही. 


एका क्रेडिट कार्डच्या बदल्यात मिळवा दुसरे क्रेडिट कार्ड


जर तुमचा इन्कम प्रुफ नसतानाही क्रेडिट कार्ड मिळवायचे असेल तर तुम्ही तुमच्या आधीच्या क्रेडिट कार्डचाही वापर करु शकता. जर एखाद्या व्यक्तीने आधीपासूनच क्रेडिट कार्ड घेतले असेल आणि वेळोवेळो त्यांचे पेमेंट होत असेल आणि क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल तर दुसरं क्रेडिट कार्ड आरामात तुम्ही घेऊ शकता. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर इन्कम प्रुफ न दाखवताही तुम्ही क्रेडिट कार्ड घेऊ शकता. 


इन्कम प्रुफ नसतानाही या बँका देतात क्रेडिट कार्ड


- भारतीय स्टेट बँक
- बँक ऑफ बडोदा
- कोटक महिंद्रा बँक
- अॅक्सिस बँक
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया