नवी दिल्ली: भारतीय बाजारात वाहनांच्या निर्मितीत ज्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्याचप्रमाणात वाहन चोरी होण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, आता वाहन असो किंवा स्मार्टफोन काहीही चोरीला गेले तरी चिंता करण्याची गरज नाही. चोरी झालेल्या वस्तूंची योग्य ठिकाणाची तुम्हाला माहिती कळणार आहे. कारण, बाजारात 'रिअल टाईम मिनी डिव्हाईस' या नावाचे यंत्र उपलब्ध झाले आहे. रिअल टाईम मिनी डिव्हाईच्या मदतीने चोरीला गेलेल्या वस्तू पुन्हा मिळवू शकणार आहेत. कार, बाईक, स्मार्टफोन, आणि इतर कोणत्याही वस्तूंसोबत मिनी डिव्हाईसला कनेक्ट करता येणार आहे. डिव्हाईस कनेक्ट झाल्यानंतर संबधित वस्तुची योग्य ठिकाणाची माहिती मिळणार आहे. या डिव्हाईसची ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. मिनी डिव्हाईस ऑनलाईन स्टोअरमध्ये १ हजार ५७५ रुपयांत खरेदी करता येणार आहे. हे अतिशय लहान असे डिव्हाईस असल्यामुळे या यंत्राला मिनी डिव्हाईस असे नाव देण्यात आले आहे.     


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचे म्हणजे मिनी डिव्हाईसला इंटरनेट किंवा वायफाय यांसारख्या कनेक्टिव्हिटीशी जोडण्याची गरज नाही. या डिव्हाईसमध्ये नॅनो सिमचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे  कोणत्याही भागात हा डिव्हाईस ट्रॅक करता येणार आहे. मिनी डिव्हाईसची मुळात ऑनलाईन किंमत २ हजार ४२९ रुपये इतकी आहे, परंतु डिस्काऊन्टसह १ हजार ५७५ रुपयांत याची खरेदी करता येणार आहे. हे अतिशय लहान डिव्हाईस आहे. 


रिअल टाईम मिनी डिव्हाईसचे वैशिष्ट्ये


हे डिव्हाईस 2G GSM/GPRS/GPS, TCP/IP या नेटवर्कवर काम करणार आहे. डिव्हाईसमध्ये रिजार्जेबल बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे. साधारणता बॅटरीची क्षमता ३ दिवसाची आहे. तसेच हे वाटरप्रुफ आहे. एवढेच नव्हेतर, एसएमएसच्या मदतीनेदेखील चोरीला गेलेल्या वस्तूंची माहिती मिळणार आहे. 


अशाप्रकारे कनेक्ट करा 


डिव्हाईसला स्मार्टफोनसोबत कनेक्ट करण्यासाठी यात नॅनो सिमकार्ड देण्यात आले आहे. सिम टाकल्यानंतर व्यवस्थित कॅप लागली का नाही याची काळजी घ्या. मग पॉवर बटन ऑन करा. आता तुमच्या फोनमध्ये सिक्योमोर (Secumore)  हा अॅप डाउनलोड करा. ज्या प्रकारे आपण स्मार्टफोनला ब्लुटूथसोबत कनेक्ट करतो तशीच क्रिया येथे करायची आहे. अॅप इंस्टाल झाल्यानंतर डिव्हाईसच्या मागे दिलेला IMEI नंबर आणि पासवर्ड समाविष्ट करा. त्यानंतर रिअल टाईम ट्रॅकिंग असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. रिअल टाईम ट्रॅकिंगवर क्लिक केल्यानंतर काही क्षणातच फोन मिनी डिव्हाईसची लोकेशन ट्रक करायला सुरुवात करेल. अशाप्रकारे तुम्हाला तुमची वस्तू परत मिळण्यास मदत होईल.