मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांना एका तरूणीने चॅलेन्ज केलं आहे. राम कदम यांनी मुलींविषयी जे बेताल वक्तव्य केलं होतं, त्यानंतर या मुलीने हे चॅलेन्ज केलं आहे. या मुलीने हे आव्हान देताना त्याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या मुलीचं नाव मीनाक्षी पाटील आहे, तसंच ती पुण्याची रहिवासी असल्याचं व्हिडीओत सांगतेय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


 राम कदम नेमकं काय बोलले होते खालील लिंकमध्ये वाचा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओ : दहीहंडीच्या गर्दीसमोर राम कदम यांचा जीभेवरचा ताबा सुटला


या मुलीने व्हिडीओ जे काही म्हटलं आहे, ते खाली वाचा (व्हिडीओ पाहा खाली)


घाटकोपर दहीहंडी उत्सवामध्ये राम कदम यांनी एक चॅलेन्ज केला, तुम्हाला मुलगी आवडली का मला एक कॉल करा, मी तिला उचलायला मदत करतो, राम कदम मी तुम्हाला चॅलेन्ज करतेय, मला तुम्ही मुंबईत बोलवा किंवा मी मुंबईमध्ये येते, मला तुम्ही फक्त एक बोट लावून दाखवा, बाकी पुढंच उचलून न्यायची गोष्ट मी नंतर बघते.


तुम्ही जे वक्तव्य केलेलं आहे, ते अत्यंत लांच्छनास्पद आहे, शिवाय आपण महाराष्ट्रात राहतो. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, इथं स्त्रीला देव्हाऱ्यातली देवी समजतात. त्यामुळे तुमच्या असल्या घाणेरड्या वक्तव्यांची महाराष्ट्रात येथे जागा नाहीय. 


तुम्ही ज्या काही प्रकरणावर बोलला आहात ना, मला त्याची शहानिशा करायची आहे. भेटूयात आपण आमने सामने, तुमच्या फोनची मी नक्कीच वाट बघेन, आजपर्यंत तुम्हाला मी खूप कॉल केले होते. 


याच्या आधीपण तुमच्या काही वक्तव्यांवर कॉल केले होते. आताही मी तुम्हाला कॉल केले होते, पण तुमच्याकडून अन्सर नाहीय. आता प्रतिक्षा मला तुमच्या कॉलची आहे सर, नक्की कॉल करा मला, तुम्ही नक्की कॉल कराल ही अपेक्षा...


राम कदम म्हणतात हरकत नाही


दरम्यान, राम कदम यांनी म्हटलंय, की जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर कुणाची माफी मागण्यास मला हरकत नाही.