मुंबई : अॅपल आणि सॅमसंग यांच्यातील वाद कोर्टात पोहोचला आणि कोर्टाचा निर्णय अॅपलच्या बाजुने लागल्याने सॅमसंगला अॅपलला 3600 कोटी रुपये भरपाई म्हणून द्यावे लागणार आहेत. सॅमसंगने डिझाईन चोरल्याचा आरोप अॅपलने केला होता. अमेरिकेच्या कोर्टात ही सुनावणी सुरु होती. गेल्या 7 वर्षापासून हे प्रकरण कोर्टात होतं. ज्यामध्ये कोर्टाने आज मोठा निर्णय दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोर्टाने डिझाईन चोरी केल्या प्रकरणी सॅमसंगला दोषी ठरल्याने अॅपल कंपनीला आता 3600 कोटी भरपाई म्हणून द्यावे लागणार आहेत. 2011 मध्ये अॅपलकडून सॅमसंग विरोधात तक्रार करण्यात आली होती. सॅमसंगने पेटेंट आयफोनचं डिझाईन चोरी केलं होतं. सुरुवातीला कोर्टाने सॅमसंगला दोषी ठरवलं त्यानंतर कोर्टाने सॅमसंगला एक अरब डॉलर अॅपलला भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले.


सॅमसंगने मात्र भरपाई देण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. भरपाई म्हणून द्यावी लागणारी रक्कम कमी करण्याची मागणी सॅमसंगने केली आहे. अॅपलने कोर्टाच्या निर्णयावर समाधान असल्याचं म्हटलं आहे. 


अॅपलने सॅमसंगवर आयफोनचे तीन डिझाईन पेटेंटसह दोन यूटिलिटी पेटेंट देखील चोरल्याचा आरोप केला होता. पेटेंट फंक्शनला नुकसान पोहोचवल्याच्या आरोपाखाली देखील सॅमसंगवर जवळपास 34 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.