Fact Check | तुमच्या मोबाईलमध्ये सोनं? पाहा नक्की सत्य काय?
तुमच्या मोबाईलमध्ये सोनं आहे असं तुम्हाला जर कुणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही.
मुंबई : तुमच्या मोबाईलमध्ये सोनं आहे असं तुम्हाला जर कुणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण, तुमच्या मोबाईलमध्ये सोनं आहे असा दावा करण्यात आलाय. सध्या सोन्याला चांगलाच भाव आहे. या दाव्याने अनेकांनी आपले जुने मोबाईलही जपून ठेवलेयत. त्यामुळे आम्ही याची पोलखोल केली. मग काय सत्य समोर आलं पाहुयात. (gold in cell phones fact check of viral messege)
दावा आहे तुम्ही वापर असलेल्या मोबाईलमध्ये सोनं असतं. त्यामुळे तुम्ही जर जुना झालेला मोबाईल फेकून देत असाल तर विचार करा. तुम्हाला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.
हा दावा केल्यानं अनेकांना याबाबत आश्चर्य वाटू लागलंय. सध्या सोन्यानं पन्नास हजारी गाठलीय. त्यामुळे खरंच मोबाईलमध्ये सोनं असतं का? असा प्रश्न अनेक जणांनी मोबाईल विक्री करणाऱ्यांनाही विचारला. पण, अनेकांना शंकांचं निरसन झालं नाही.
मोबाईल हा हल्ली सगळ्यांकडेच असतो. त्यामुळे आम्ही या दाव्याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला.आम्ही एक्सपर्टना भेटलो. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि या दाव्याची सत्यता जाणून घेतली.
काय खरं काय खोटं?
सोनं गंजत नसल्याने स्मार्टफोनमध्ये थोडं सोने वापरतात. मोबाईल सर्किट बनवण्यासाठी सोन्याचा वापर करतात. मोबाईलमधील सोन्याची किंमत फक्त 50 ते 100 रुपये असेल. सोने काढण्यासाठी विशेष केमिकल्सचा वापर करतात. 1 ग्रॅम सोन्यासाठी 41 मोबाईल फोन लागतात.
सोनं फक्त मोबाईलमध्येच नसतं तर चांगल्या हेडफोनमध्ये, कॉम्प्युटरमध्ये, अगदी मोबाईलच्या सिममध्येही सोनं असतं. पण, ते सोने काढणे सहज शक्य नाहीये. सोनं काढण्यासाठी काही विशेष केमिकल्स वापरली जातात. ते किंचितच असल्याने त्याचा जास्त फायदाही नाही. पण, आमच्या पडताळणीत मोबाईलमध्ये सोनं असते हा दावा सत्य ठरला.