नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांच्यासाठी एक स्पेशल प्लॅन येत आहे ज्यामध्ये त्यांना कमी पैसे भरावे लागतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिलायन्सच्या जिओची 'धन धना धन' ऑफरची व्हॅलिडिटी आज म्हणजेच ९ नोव्हेंबरपासून संपण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिओ युजर्संना सेवेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. जिओने तत्पूर्वी ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची व्हॅलिडिटी दिली होती. मात्र कंपनीने नवीन प्लॅन्स काहीसे महाग आहेत. त्यामुळे अशा काही स्पेशल ऑफर्सने ग्राहकांचा नक्कीच फायदा होईल. अमेजन-पे मधून जिओच्या रिचार्जवर ९९ रुपयांचे कॅशबॅक मिळत आहे. म्हणजेच ३९९ रुपयांचा रिचार्जसाठी तुम्हाला फक्त ३०० रुपये मोजावे लागतील. 


कॅशबॅक ऑफरचा फायदा कसा घ्यावा :


  • अमेजन-पे वर कॅशबॅक ऑफरचा फायदा फक्त फर्स्ट टाइम युजर्संना मिळेल. रिचार्जसाठी तुम्हाला अमेजन-पे मधून रिचार्ज करावा लागेल. 

  • कॅशबॅक फक्त जिओच्या ३९९ रुपयांच्या रिचार्जवर मिळेल. 

  • ही ऑफर फक्त १४ नोव्हेंबर २०१७ पर्यंत व्हॅलिड आहे. 

  • युजरने यापूर्वी देखील अमेजन-पे मधून रिचार्ज केले आले तर १०० किंवा त्यापेक्षा अधिक रिचार्जवर तुम्हाला ५० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. ही ऑफर १५ नोव्हेंबरपर्यंत व्हॅलिड असेल. 

  • अमेजन-पे मधून एकापेक्षा अधिक वेळा रिचार्ज केला असल्यास तुम्हाला २०% पर्यंत रिपीट कॅशबॅक मिळेल. ही ऑफर ३० नोव्हेंबरपर्यंत व्हॅलिड असेल. 

  • युजर्सना अमेजन-पे वॉलेट तर्फे कॅशबॅक ७ दिवसांच्या आधी मिळेल. 


ऑफरचा फायदा घेण्यासाठी काय करावे ?


ऑफरचा फायदा घेण्यासाठी जिओ युजरने गूगल प्ले स्टोरवरून amazon फ्री अॅप इंस्टॉल करा. अॅप ओपन केल्यानंतर मेनू बारमध्ये अमेजन-पे वर जा. तिथे वॉलेट अकाऊंटशी संबंधित डिटेल्स येतील. त्यानंतर तुम्ही बँकींग, डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या मदतीने वॉलेटमध्ये मनी अॅड करू शकता. त्यानंतर रिचार्जच्या ऑप्शनमध्ये जावून कॅशबॅक ऑफरचा फायदा घेऊ शकता. 
त्यानंतर तिथे तीन ऑप्शन्स दिसतील. तिथे तुमचा मोबाईल नंबर, ऑपरेटर कोड आणि अमाऊंट अॅड करा. त्याचबरोबर या