खुशखबरी! आता YouTube प्रमाणे Instagram च्या या फीचरवर भरपूर कमाई
इंस्टाग्रामच्या Reels च्या माध्यमांतून टिकटॉकसारखा शॉर्ट म्युझिकल व्हिडिओ बनवता येतो
फेसबुकची मालकी असलेले इंस्टाग्रामने गेल्या वर्षी Reels ला लॉंच केले होते. इंस्टाग्रामच्या Reels च्या माध्यमांतून टिकटॉकसारखा शॉर्ट म्युझिकल व्हिडिओ बनवता येतो. यामध्ये 15 मिनिटांचा व्हिडिओ आपण रेकॉर्ड करू शकतो. त्याला आपल्या पसंतीच्या म्युझिक लावता येते.
इंस्टाग्रामच्या Reels मध्ये आता आणखी नवीन फिचर्स ऍड होऊ शकतात. एन्ड्राईड आणि आयओएस डेव्हलपर एलेसॅंन्ड्रो पालुझीने सांगितले की, इंस्टाग्राम रील वापरकर्त्यांना मॉनिटरी बोनस देण्याच्या विचारात आहे.
बॅकएँडला काम करीत असताना पालुझीला या फिचर्सबाबत माहित झाले. त्यांनी त्याबाबतचा स्क्रीनशॉट आपल्या ट्विटर अकॉऊंटवर शेअर केला आहे. या स्क्रिनशॉटच्या माहितीनुसार वापरकर्त्यांचे Reels एका विशिष्ट मर्यादेपलिकडे पाहण्यात आल्यास त्याला मॉनिटरी बोनस देण्यात येईल. अद्याप याविषयीच्या अटी नियमांबाबत खुलासा झालेला नाही.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्याचे पैसे देणारा हा पहिलाच प्रयोग नाही. याआधीसुद्धा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना आपल्या क्रिएटीव्हिटीचे पैसे देत आले आहेत.